II केवळ तू II
देखोनिया रूप तुझे भासे..
तुझ पुढे सारे जग खुजे..
नित्य मनी ध्यास तुझा..
नाही मनात काही दूजे..!!
संशय तो कसला तुज..
नि:संशय हृदय अर्पिले..
मन पाखरू बघ कसे..
तुज भोवतीच भिरभिरले..!!
विसर ना पडला कधी..
आठवणीच काय सांगते..
तुज शिवाय हे जीवन..
मज रिते रिते भासते..!!
बोललो ना काही जरी..
नयन भाषा नित्य बोलतो..
कळेना का तुझ काही..
स्वप्नी सारे सांगू पाहतो..!!
ना कळले कधीच तुला..
प्रेंम खरे काय असते..
ध्यानी मनी केवळ तू..
तूच माझ्या स्वप्नी वसते..!!
*चकोर*
देखोनिया रूप तुझे भासे..
तुझ पुढे सारे जग खुजे..
नित्य मनी ध्यास तुझा..
नाही मनात काही दूजे..!!
संशय तो कसला तुज..
नि:संशय हृदय अर्पिले..
मन पाखरू बघ कसे..
तुज भोवतीच भिरभिरले..!!
विसर ना पडला कधी..
आठवणीच काय सांगते..
तुज शिवाय हे जीवन..
मज रिते रिते भासते..!!
बोललो ना काही जरी..
नयन भाषा नित्य बोलतो..
कळेना का तुझ काही..
स्वप्नी सारे सांगू पाहतो..!!
ना कळले कधीच तुला..
प्रेंम खरे काय असते..
ध्यानी मनी केवळ तू..
तूच माझ्या स्वप्नी वसते..!!
*चकोर*