Showing posts with label कवीता. Show all posts
Showing posts with label कवीता. Show all posts

Wednesday, 29 September 2021

जीवन सुंदर आहे

 जीवन सुंदर आहे..


जीवन सुंदर आहे 

ते नित्य पाण्यासारखे वाहते!

कर्माची नाव त्यावरून

सुखदुःखाचा किनारा गाठते!!

--सुनील पवार..✍🏼

*सुप्रभात🌞शुभ सकाळ*

Saturday, 3 October 2020

मूक एकांत

 मूक एकांत..

मनी अंधारले दाट
कुठे शोधायची वाट।
अवसेचाच प्रवास
कशी व्हायची पहाट।
पंखहीन झाले तन
खुणावते का आकाश।
वात नुरली दिव्यात
कसा देईल प्रकाश।
माणसांच्या या गर्दीत
भासे एकटेच मन..
नाही कोणी ओळखीचा
दूर गेले सारे क्षण।
कुठवरला प्रवास
कुठे चालला अंतात।
शब्दातुन मांडलेला
मूक आकांत आकांत।
--सुनील पवार..✍🏼

Friday, 24 July 2020

एकांत..

एकांत..
हल्ली,
आपल्याच मनाशी
आपलेच वाद होतात!
न घडणाऱ्या संवादाचे
नकळत पडसाद उमटतात!!
त्यात मीच वादी होतो
अन् फिर्यादही मीच करतो!
मनाच्या अदृश्य न्यायालयात
न्यायाधीश सुद्धा मीच असतो!!
मीच निर्मिलेल्या कटघऱ्यात
पुन्हा मीच दोषी ठरतो
माझी शिक्षा मी मलाच सुनावतो!
अन् नको असलेला एकांत
नकळत माझ्या वाट्यास येतो!!
--सुनील पवार..✍️
710
People Reached
46
Engagements
25
4 Comments
1 Share
Like
Comment
Share

Saturday, 10 August 2019

अश्रुंचे मोल..

अश्रुंचे मोल..
वाहणाऱ्या अश्रुंचे मोल
तू आता तरी जाण..
तुझ्या बेपर्वा कोसळण्यात
थोडी विनम्रता आण..!!
थांबव आता मृत्यूसत्र
तुझा होऊ दे अनुराग..
जल जीवन असते म्हणतात
आपल्या ब्रीदला तू जाग..!!
--सुनिल पवार..✍️

बापाचं मन..

बापाचं मन..
स्वतः बाप झाल्याशिवाय
लेकास बापाचे मन कळत नाही..
बाप नावाच्या चंदनाचा सुवास
देह विझल्याशिवाय दरवळत नाही..!!
हीच खरी शोकांतिका आहे
बाप नावाच्या ताकदीच्या भूमिकेची..
जीवनरुपी नाटकाचा भार उचलूनही
तरतूद नसते कसल्याच मानधनाची..!!
--सुनिल पवार..✍️

हाक..

हाक..
ओढ तुझी मला
की कळेना माझी तुला,
इतके मात्र खरे की, 
हृदयाची हाक
जाणवते हृदयाला..
ही अनुभूती कुठून
अन् कशी मिळते प्रेमाला..
अशी कोणती संजीवनी
मिळते अचेत देहाला..!!
--सुनिल पवार..✍️
वाचा तिढा : भाग ५६
https://marathi.pratilipi.com/story/i94jayynxqzv…

मित्रा...

मित्रा...

मित्रा तुझ्या असण्याने मला मैत्रीचे सूत्र कळले..
सुख पकडून आलेले हात, दुःखात मात्र गळाले..!!
पण ठीक आहे ना! दुनियेची हीच रीत आहे..
अपवाद कोणी नाही, म्हण हीच प्रचलित आहे..!!
नाही म्हणायला चांगली उदाहरणंही आहेत जगात
पण मनाची पुरचुंडी खोलणारा तो श्रीकृष्ण कुठे आहे..!!
कर्ण दुर्योधनाचे सुद्धा लोक गुणगाण गात असतात..
स्वार्थ निःस्वार्थ दोन पारडी, न जाणे कोणाला मत देतात..!!
नाही! मी पुराण सांगत नाही आणि नकार घंटाही वाजवत नाही..
पण पुस्तकात वाचलेलं सर्व, वास्तवात कुठे दिसत नाही..!!
असो..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
--सुनिल पवार...✍️
Image may contain: text that says 'मित्रा... मित्रा तुझ्या असण्याने मला मैत्रीचे सूत्र कळले सुख पकडून आलेले हात दुःखात मात्र गळाले| पण ठीक आहे दुनियेची हीच रीत आहे अपवाद कोणी नाही म्हण हीच प्रचलित आहे| नाही म्हणायला चांगली उदाहरणंही आहेत जगात पण मनाची पुरचुंडी खोलणारा श्रीकृष्ण कुठे आहे| कर्ण दुर्योधनचे सुद्धा लोक गुणगाण गात असतात स्वार्थ नि:स्वार्थ दोन पारडी जाणे कोणाला मत देतात| नाही मी पुराण सांगत नाही आणि नकार घंटाही वाजवत नाही पण पुस्तकात वाचलेलं वास्तवात कुठे दिसत नाही..!! असो.. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. Yoकr Gote'
299
People Reached
21
Engagements
14
3 Comments
1 Share
Like
Comment
Share

नाही भरवसा...

नाही भरवसा...
सोबतीने चाललो जरी
मेळ नव्हता पावलांचा..
कधी जाणवला नाही
जोड तुझ्या श्वासांचा..!!
काळ असाच लोटला
मृगजळी भासांचा..
मृग धावतो अविरत
कस्तुरीच्या ध्यासाचा..!!
ठाव लागेना परी
आपल्याच नाभीचा..
झाला शिकार अवचित
कुण्या एका पारधीचा..!!
तीच अवस्था जाण
घे वेध आता मनाचा..
थांबावे वाटते इथेच
नाही भरवसा कोणाचा..!!
--सुनिल पवार..✍️