Saturday, 3 October 2020

मूक एकांत

 मूक एकांत..

मनी अंधारले दाट
कुठे शोधायची वाट।
अवसेचाच प्रवास
कशी व्हायची पहाट।
पंखहीन झाले तन
खुणावते का आकाश।
वात नुरली दिव्यात
कसा देईल प्रकाश।
माणसांच्या या गर्दीत
भासे एकटेच मन..
नाही कोणी ओळखीचा
दूर गेले सारे क्षण।
कुठवरला प्रवास
कुठे चालला अंतात।
शब्दातुन मांडलेला
मूक आकांत आकांत।
--सुनील पवार..✍🏼

No comments:

Post a Comment