Showing posts with label व्यंग. Show all posts
Showing posts with label व्यंग. Show all posts

Monday, 4 January 2021

रात्र निरव

 रात्र निरव..

रात्रीची चाहूल
त्यात एकटे उदास मन।
काही उबदार
तर काही गोठवणारे क्षण।
अपेक्षेत झुळूक
वाहतो बोचरा वारा।
अशांत चित्ताला
कुठे मिळेना थारा।
नजरेत आकाश
मुक्त ताऱ्यांनी सजलेले।
अन् चंद्र एकाकी
क्षण दवांनी भिजलेले।
एक तुटलेला तारा
स्वतःस जाळणारा।
जळता जळताही
इच्छा पूर्ती करणारा।
--सुनील पवार..

Thursday, 15 October 2020

मैंने जीना सीख लिया

मैंने जीना सीख लिया..
न घुटेगा अब दम मेरा
मैंने मरकर जीना सीख लिया।
न दबेगा अब हौसला मेरा
मैंने गिरकर उठना सिख लिया।
तुम बिछा दो राह में काँटे
मैंने छालों को पाँव बना दिया।
या उजाड़ दो तुम घर मेरा
मैंने खुद को छाँव बना दिया।

--सुनील पवार....


Saturday, 3 October 2020

मूक एकांत

 मूक एकांत..

मनी अंधारले दाट
कुठे शोधायची वाट।
अवसेचाच प्रवास
कशी व्हायची पहाट।
पंखहीन झाले तन
खुणावते का आकाश।
वात नुरली दिव्यात
कसा देईल प्रकाश।
माणसांच्या या गर्दीत
भासे एकटेच मन..
नाही कोणी ओळखीचा
दूर गेले सारे क्षण।
कुठवरला प्रवास
कुठे चालला अंतात।
शब्दातुन मांडलेला
मूक आकांत आकांत।
--सुनील पवार..✍🏼

Monday, 27 July 2020

ओरखडे...

ओरखडे...

विचारांच्या ओघात
काळ नकळत मागे नेतो..
भूतकाळातले ओरखडे
वर्तमानात उमटवत राहतो..!!
मन सैरभैर होते अन्
मनःशांतीस शोधत राहते..
पाश्चातापाच्या अग्नीत
ते दिवसरात्र जळत राहते..!!
मग सुटका तरी कशी व्हावी
तरणोपाय आहे का काही..?
मन शोधत राहते दिलासा
पण शब्दांनी मन भरत नाही..!!
--सुनील पवार..✍️
256
People Reached
6
Engagements
14

Saturday, 25 July 2020

दुःखद

दुःखद..

तो प्रसिद्ध होता म्हणून
त्याच्यासाठी देश हळहळला..
पण हजारो सिद्ध बळीराजाने
अंधारातच आपला देह टांगला..!!
किती घरे उध्वस्त झाली
उभ्या संसाराची माती झाली..
ना वाहिनेने त्याची दखल घेतली
ना वाचा वृत्तपत्राला फुटली..!!
जो तो उजेडाला नमन करतो
अंधाराला कोण पुसतो..
किती दिवे फडफडती वादळात
हात त्यावर कोण धरतो..!!
सिद्ध असो वा प्रसिद्द असो
किंवा असेना का कोणी उपेक्षित..
जाणारा हा माणूसच असतो
तरीही राहतो तोच दुर्लक्षित..!!
त्या म्हणीत असावे तथ्य
जग सारे आहे मिथ्य..
आपणच आपले सगेसोयरे
जीवनाचे हेच अंतिम सत्य..!!
--सुनील पवार..✍️
1,813
People Reached
110
Engagements
54
4 Comments
4 Shares
Like
Comment
Share

Sunday, 14 July 2019

क्या समझे?

क्या समझे?
नहीं समझे?
चलो कोई बात नहीं
वैसे भी
यहाँ बहरों की कमी नही
शुक्र है
अभी तक हमारे कानों में
ईयर फोन की धूल जमी नहीं।
--सुनिल पवार...✍️

प्रलंबित...

प्रलंबित...
इथे प्रत्येकाला
चारित्र्याचे दाखले हवे असतात
सालं जीवन आहे का कोर्ट आहे
असं उद्वेगाने म्हणावे लागतेय
त्यांचे अघोषित खटले
नाहक अपराधी ठरवत जातात..!!
काळ्या कोटातले पांढरपेशे वकील
पावला पावलावर भेटत असतात
काही आपल्या बाजूने,
तर काही विरोधात दिसतात
काही चक्क उलट तपासणीही करतात
पण तरीही खटला प्रलंबित
कळत नाही
माझे वकील नेमके कुठे असतात..!!
निःपक्षी न्यायमूर्तींचीही वानवा दिसते
तारखेवर तारीख पडत राहते
साक्षीदार परागंदा दिसतो
अन् डाग अधिक गडद होत जातो..!!
निकाल लागेल तेव्हा लागेल
दोषी ठरेल किंवा निर्दोषही असेन
पण त्यानंतरही
लोकांच्या नजरेत
कितीसा बदल झालेला असेल
प्रश्न तसाच प्रलंबित आणि खटलाही
कदाचित हे कोडे मृत्यूनंतरच सुटेल..!!
--सुनिल पवार...✍️

श्रीयुत दगडाच्या कृपेने..

श्रीयुत दगडाच्या कृपेने..

विषय निघाला म्हणून सांगतो
श्रीयुत दगडाच्या कृपेने
अचानक मला ठेच लागली
आणि मी शहाणा झालो..!!
मग मी
दगडावर लक्ष केंद्रित केले
आणि दगडावर बोलू लागलो
तर त्यांनी वेड्यात काढले
आणि दगडही भिरकावले
जितके शक्य होते तितके झेलले
शेवटी मीच दगड झालो..!!
आता त्यातील
काही भजतात, काही पूजतात
तर काही दूषणही देतात
पण जाऊ दे ना
आपल्याला काय करायचं आहे
शेवटी गण गोत्र एकच
तेही दगड आणि आपणही दगड
जगणेच अवजड..!!
--सुनिल पवार...✍️

एक मॅड कविता..

एक मॅड कविता..
आता मी ठरवलंय मनापासून
की मनाच्या विपरीत वागायचं..
जीवनाची मालिका दुःखद जरी असली
तरी चार्ली चॅप्लिन बनून जगायचं..!!
मग भलेही बनू दे आयुष्याची सर्कस
निदान ते खदखदून तरी हसतील..
टाळ्याही पिटतील अगदी मनापासून
फार फार तर काय, जोकर म्हणतील..!!
तसंही आयुष्य म्हणजे एक सिनेमा झालाय
घडीभर केलेली करमणूक जणू..
मग बोथट झालेल्या त्या दिखाऊ भावनांवर
मी धनुष्य तरी कशाला ताणू..!!
बरं जाऊ दे,आता मीही चॅनल बदलतो
माझ्याच भूमिकेवर मीच हसून घेतो..
अरे हो, बॉक्स तसाही इडियट आहे
वाटलं तर पाहतो नाहीतर सरळ बंद करतो..!!
--सुनिल पवार...✍️