Sunday, 14 July 2019

एक मॅड कविता..

एक मॅड कविता..
आता मी ठरवलंय मनापासून
की मनाच्या विपरीत वागायचं..
जीवनाची मालिका दुःखद जरी असली
तरी चार्ली चॅप्लिन बनून जगायचं..!!
मग भलेही बनू दे आयुष्याची सर्कस
निदान ते खदखदून तरी हसतील..
टाळ्याही पिटतील अगदी मनापासून
फार फार तर काय, जोकर म्हणतील..!!
तसंही आयुष्य म्हणजे एक सिनेमा झालाय
घडीभर केलेली करमणूक जणू..
मग बोथट झालेल्या त्या दिखाऊ भावनांवर
मी धनुष्य तरी कशाला ताणू..!!
बरं जाऊ दे,आता मीही चॅनल बदलतो
माझ्याच भूमिकेवर मीच हसून घेतो..
अरे हो, बॉक्स तसाही इडियट आहे
वाटलं तर पाहतो नाहीतर सरळ बंद करतो..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment