Sunday, 14 July 2019

पाऊस, ती आणि मी...

पाऊस ती आणि मी..
भिजायला कोणी नाही तरीही
तो एकटाच कोसळत राहतो..
मग तिला पाहण्याऐवजी
मी त्यालाच पाहत राहतो..!!
हल्ली तो काळवेळ पाळत नाही
दिवस असो वा रात्र..
तो कोसळत राहतो वेळी,अवेळी,
अवकाळी अथवा पावसाळी
त्याचे चालू असते सत्र..!!
त्याचा प्रयत्न दिसतो
तिला भिजवण्याचा अन् रिझवण्याचा
पण तिला त्याचा गंध नसतो..
त्याच्या भावनेवर मात्र
तिच्या मनाचा प्रतिबंध दिसतो..!!
एकीकडे ती मश्गुल दिसते
सजण्या सवरण्यात
तिच्या मनाच्या भावविश्वात
तर दुसरीकडे
तो अविरत कोसळत राहतो
मी स्तब्ध होऊन
त्यालाच पाहत असतो..!!
कधीतरी मोकळे होते आकाश
अन् तो किनाऱ्याचे शल्य उरात ठेवून,
नदीच्या वाटेने निघून जातो
तरीही मी त्यालाच पाहत असतो
तो पापणीतून नकळत ओघळत राहतो..!!
--सुनिल पवार...✍️
579
People Reached
35
Engagements
You and 17 others
5 Shares
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment