Showing posts with label पाऊस कविता. Show all posts
Showing posts with label पाऊस कविता. Show all posts

Tuesday, 27 July 2021

अंकुरू दे बीज

 अंकुरु दे बिज..


तू पुन्हा एकदा आलास 

दुभंगल्या मनावर फुंकर घालायला।

पण किती वेळ थांबणार आहेस?

हे विसरु नको सांगायला।


तडा पडलेल्या मनाला

जरा वेळ लागेल सांधायला।

पण पुन्हा पाठ फिरवलीस तर

जमणार नाही नातं बांधायला।


वाहू दे रे अश्रू जरासे

लागू दे नाद्या वाहायला।

तू सुद्धा थांब जरा 

हा आनंद सोहळा पाहायला।


अंकुरु दे बिज पोटी

लागू दे सहज रांगायला।

कळू दे जगास आता

तू लागला पावसासारखे वागयला।

--सुनिल पवार..✍🏼

Saturday, 19 September 2020

नभ भरून येईल..

 नभ भरून येईल..

नभ भरून येईल
कदाचित पाऊसही पडेल।
वाहून जाईल सर्वकाही
तरीही बरंच काही मागे उरेल।
एखादा डिर उगवेल तिथे
पुन्हा हिरवळ बिलगून घेईल।
फुलं बहरतील रंगबिरंगी
अन् गंध त्यांचा मातीला येईल।
मन हरवत जाईल त्यात
नकळत त्यावर जीव जडेल।
स्पर्शत जाईल झुळूक अंगास
अन् मन क्षणात मोहरून उठेल।
एखादा कवडसा होईल अंगार
तो तनमनावर छाप सोडेल।
पुन्हा आभाळ भरून येईल
अन् कदाचित पाऊसही पडेल।
--सुनील पवार..✍️

Tuesday, 1 September 2020

लिहतो कविता तुझ्यासाठी..

लिहतो कविता तुझ्यासाठी..

लिहतो कविता तुझ्यासाठी
मोह मनाचा आवरत नाही।
तुझे फुललेलं रूप पाहून
मन सावरता सावरत नाही।
तुजसाठीच येती अंबरधारा
नभी फुलतो मेघ पिसारा।
अंग मातीचे गंधाळते अन्
पिसे भरून फिरतो वारा।
तू खेळत राहते वाऱ्यासवे
तो झुलवीत राहतो तुझी फुले।
तू देखणा साज लेऊन घेता
हिरव्या पदारावरती नक्षी झूले।
तुझ्या रूपाचा मोह नभास होतो
तोही सप्तरंग उधळत येतो।
तू रंगात त्याच्या न्हाऊन जाते
तो मोत्याने तुज मढवत जातो।
त्या मोत्यांनाच वेचून आता
मी सर शब्दांची ओवत जातो।
तो थांबला जरी बरसण्याचा
तरी लेखणीतून झरत राहतो।
--सुनील पवार..✍️

Monday, 24 August 2020

आजही बरसत आहे

 आजही बरसत आहे..


आजही बरसत आहे

तो कालही बरसत होता।

तिला भिजविण्याचा 

तो आनंद उपभोगत होता।


मग तिची मर्जी असो नसो

त्याला कसली पर्वा नसते।

तरीही ती वेडी फुलत राहते

वेळीअवेळी पदर ओलावत राहते।


तो निघून जातो एके दिवशी

सोडून तिच्या प्रेमास अन् तोडून हृदयास।

ती साठवून ठेवते त्याच्या ओल्या आठवणी

अन् पोसत राहते

तरु वेलीस, समस्त मानव जातीस।

--सुनील पवार..✍️

Thursday, 6 August 2020

अब आ गई हो तो..

अब आ गई हो तो..

ज़िन्दगी मुस्कुराने लगी
ज़ब तेरा आना हुआ।
तेरे इस क़दर आने से
मिट्टी का सोना हुआ।
अब आ गई हो तो
जाने के बहाने ना कर।
मरे उम्मीद के कटोरे में
मोतियों के दाने भर।
--सुनील पवार..✍️
Image may contain: one or more people, text that says 'अब आ गई हो तो ज़िन्दगी मुस्कुराने लगी ज़ब तेरा आना हुआ| तेरे इस क़दर आने से मिट्टी का सोना हुआ| अब आ गई हो तो जाने के बहाने ना कर| मरे उम्मीद के कटोरे में मोतियों के दाने भर। सुनील पवार..'
176
People Reached
6
Engagements
5

|| धुंद बरसणाऱ्या पावसा ||

|| धुंद बरसणाऱ्या पावसा ||

धुंद बरसणाऱ्या पावसा
तू नाहक छळू नको मनाला।
या एकांताच्या क्षणाला
नाही कोणीच सोबतीला।
तू खुशाल भिज एकटा
मला नाही पाऊस व्हायचं।
आतुरता दोन्ही कडून असावी
हे तुला कधी समजायचं।
तू रंगवले जरी क्षितिज
तरीही मी भुलणार नाही..
माझ्या मनाचे इंद्रधनू
पुन्हा आभाळी रंगणार नाही..!!
आता एकच कर पावसा
आवर घाल तुझ्या मनवाऱ्याला।
अन खुशाल भिजव क्षणाला
झाकून ओल्या आठवणीला।
--सुनिल पवार..✍🏼
Image may contain: text that says 'धुंद बरसणाऱ्या पावसा नाहक छळू नको मनाला| या एकांताच्या क्षणाला नाही कोणीच सोबतीला। धुंद बरसणाऱ्या पावसा तू खुशाल भिज एकटा मला नाही पाऊस व्हायचं। आतुरता दोन्ही कडून असावी हे तुला कधी समजायचं। तू रंगवले जरी क्षितिज तरीही मी भुलणार नाही.. माझ्या मनाचे इंद्रधनू पुन्हा आभाळी रंगणार नाही..!! आता एकच कर पावसा आवर घाल तुझ्या मनवाऱ्याला| अन खुशाल भिजव क्षणाला झाकून ओल्या आठवणीला| सुनिल पवार..'
129
People Reached
5
Engagements
4

Saturday, 25 July 2020

इतकी कृपा कर..

इतकी कृपा कर..
बरीच वर्षे झाली
तसा पाऊस पुन्हा आला नाही!
तो नादवणारा मृदुगंध
श्वासातून अजून दूर झाला नाही!
एका मोठ्या कालखंडानंतर
ऋतुने पुन्हा कुस बदलली आहे!
आता वेळ दवडू नको
बघ आयुष्याची सांज होत आली आहे!
तहान इतकीही नाही
की तू रिते व्हावे माझ्यावर!
केवळ एक थेंब पुरेसा आहे
बस इतकीचं कृपा कर चातकावर!!
--सुनील पवार..✍️
453
People Reached
25
Engagements
23

Friday, 24 July 2020

तुझ्या आठवणींचा पाऊस..

तुझ्या आठवणींचा पाऊस..
चिंब भिजवून जातो
तुझ्या आठणींचा पाऊस।
पागोळ्यातून गळत राहतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
मी डोकावत राहतो खिडकीतून
तो रिमझिम बरसताना दिसतो।
वाऱ्यासही बेभान करतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
उधाणली लाट किनारी येते
स्थितप्रज्ञता भग्न करून जाते।
सागरासही उधाण आणतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
कधी संचित तळे होतो
कधी खळखळ ओहळ होतो।
तर कधी नुसताच चिखल करतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
--सुनील पवार..✍️
624
People Reached
43
Engagements
31
5 Comments
2 Shares
Like
Comment
Share