Saturday, 19 September 2020

नभ भरून येईल..

 नभ भरून येईल..

नभ भरून येईल
कदाचित पाऊसही पडेल।
वाहून जाईल सर्वकाही
तरीही बरंच काही मागे उरेल।
एखादा डिर उगवेल तिथे
पुन्हा हिरवळ बिलगून घेईल।
फुलं बहरतील रंगबिरंगी
अन् गंध त्यांचा मातीला येईल।
मन हरवत जाईल त्यात
नकळत त्यावर जीव जडेल।
स्पर्शत जाईल झुळूक अंगास
अन् मन क्षणात मोहरून उठेल।
एखादा कवडसा होईल अंगार
तो तनमनावर छाप सोडेल।
पुन्हा आभाळ भरून येईल
अन् कदाचित पाऊसही पडेल।
--सुनील पवार..✍️

No comments:

Post a Comment