Friday, 28 October 2016

|| भाव शुभेच्छांचे ||

|| भाव शुभेच्छांचे ||
============
दारावर टांगलेल्या कंदीलात,
उजेडाचा अभाव आहे..
अवसेला न भेटण्याचा,
चंद्राचा स्वभाव आहे..!!

रोषणाई लख्ख दिव्यांची,
उजळला सारा गाव आहे..
तिमारातल्या उत्सवावर
चांदण्यांचा प्रभाव आहे..!!
रांगोळीतले रंग उडाले,
केले जसे घुमजाव आहे..
गेरूच्या या छाताडावर,
कोरले माझे नाव आहे..!!
भासतो तसा उत्साही मी,
बेमालूम परी बनाव आहे..
माझ्या मनाच्या दीपावलीत,
शुभेच्छांचेच भाव आहेत..!!
****सुनिल पवार...✍🏽

II दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा II

🌺दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
💥💥💥💥💥
एक करंजी..
=*=*=*=आनंदाने भरलेली..
💥💥💥💥
एक शंकरपाळी..
=*=*=*=चौकस विचारांची..
💥💥💥💥
एक चकली..
=*=*=*=कीर्ती विस्तारणारी..
💥💥💥💥
एक लाडू..
=*=*=*=ऐक्य एकवटलेला..
💥💥💥💥
एक मिठाई..
=*=*=*=गोडवा रुजलेली..
💥✨💥✨💥✨💥
एक दिवा..
=*=*=*=मांगल्य भारलेला..
💥✨💥✨💥✨💥
एक रांगोळी..
=*=*=*= रंग भरणारी..
💥✨💥✨💥✨💥
एक कंदील..
=*=*=*= यशोभरारी घेणारा..
💥✨💥✨💥✨💥
एक उटणे..
=*=*=*=जीवन सुगंधित करणारे..
💥✨💥✨💥✨💥
एक कारोटे..
=*=*=*=समतोल राखणारे..
💥✨💥✨💥✨💥
अन एक मी..
=*=*=*=शुभेच्छा देणारा..!!
💥✨💥✨💥✨💥
=*=*=*=सुनिल पवार...✍🏽 


|| भ्रम ||

|| भ्रम ||
======
आज,
केला खुलासा फुलाने
त्याच्या
न उलघडणाऱ्या त्या कृतीचा..
अन कळून चुकले
नव्हता तसा कोणताच मुद्दा
त्याच्या मनाच्या स्वीकृतीचा..!!
मग
का बरे पाळले असावेत
भ्रमराने ते सारेच भ्रम
फुलाच्या मधुर हसण्याचे
त्याच्या मोहक दिसण्याचे..?
अन
फुलांचेही
हे कसले वेड असावे
भ्रमरास  कवेत घेत
अलगद मिटून घेण्याचे..??

****सुनिल पवार....🏽

Monday, 24 October 2016

|| धागा तव प्रेमाचा ||

|| धागा तव प्रेमाचा ||
==============
रिते केलेस तू अलगद
ओंजळीत
तुझे साचलेलं मन..
सुन्न मी किनाऱ्यावर
स्तब्ध
बैसलो क्षण दोन क्षण..!!


त्या यातनेच्या घरात
मी एकटाच होतो
हा भ्रम होता तर..?
कल्पना नव्हती मला
नकळत केले होतेस
तुही नेमके
त्याच घरात घर..!!

ओलावा अंतरात
नजरेसमोरचे किनारे
ना पाहिले तू कधी
ना जाणवू दिले मीही काही..
छाटलेले पंख स्वप्नांचे
अन घाव वर्मीचे
नासुर होते
त्यातलेच काही..!!

पण
पाहिलीं तुझी ओंजळ रीती
अन
उमगली नियतीची नीती..
ओसरलेल्या बहराची
होणारी ती
पानगळतीतली परिणीती..!!

आता,
उरला दोष ना कुणावर
ना आरोप कसला..
सैल केले बंध मनाचे
साधण्यास किनारा
तव प्रेमाचा जीर्ण धागा
मी गुंफण्यास घेतला..!!
***सुनिल पवार..✍🏽

II मनाच्या बांधाला II

मन मनाच्या.. 

मनाच्या बांधाला घालावे
स्नेहाचे लिंपण..
मनाच्या कोपऱ्यात शिंपडावे
सुगंधित शिंपण..!!


मनाच्या कप्प्यातुन मिटावा
नाकारात्म काळोख..
मनाच्या सूर्याशी व्हावी
सकारात्मक ओळख..!!

मनाच्या कांगोऱ्यास फुटावा
स्वप्नांचा धुमारा..
मनाच्या गाभाऱ्यात फुलावा
आनंद फुलोरा..!!
--सुनिल पवार..✍🏽
*सुप्रभात शुभ सकाळ*

II प्रश्न हाच आहे II

II प्रश्न हाच आहे II
============
प्रश्न हा नाही,
पाणी किती वाहून गेले..
प्रश्न हाच आहे,
अजून किती आहे ओले..!!


प्रश्न हा नाही,
जगणं किती फोल आहे..
प्रश्न हाच आहे,
डोह किती खोल आहे..!!

प्रश्न हा नाही,
क्षणात किती बहर आहे..
प्रश्न हाच आहे,
मनात किती दरवळ आहे..!!

प्रश्न हा नाही,
भावना किती सुप्त आहे..
प्रश्न हाच आहे,
समाज किती मुक्त आहे..!!

प्रश्न हा नाही,
मला किती छळणार आहे..
प्रश्न हाच आहे,
तुला किती कळणार आहे..!!
****सुनिल पवार....✍🏽

|| व्यसनाच्या चक्रव्यूहात ||

|| व्यसनाच्या चक्रव्यूहात ||
==================
त्या व्यसनाने निर्मिलेल्या
चक्रव्यूहात
तो त्वेषाने घुसला..
कळले ना त्यास,
असंगासी संग केला
अन..
तेथेच तो फसला..!!


तो सोडत होता
वलयामागून वलय धुराचे
झाकोळला त्यातच तो
अन..
बचाव सारेच उघडे पडले..
तारुण्याच्या गुर्मीत गाफील
न समजले त्यास
पाऊल कधी वाकडे पडले..!!

आता त्यानेच सोडलेले ते
सुशोभित वलयांकित कडे
भस्मासुर जसे
त्याच्याच जीवावर उठले..
ग्रासू लागले जन्मदात्यास
मृत्यूचे दूतच ते
त्यांना कशाचे
सोयर सुतक ते कुठले..?

त्याच धुराच्या कोंडाळ्यात
आता घुसमटला जीव त्याचा
मरणासन्न हतबल
मृत्युने घातला घाला
थोटकांचा खच
आसपास विखुरला..
अन
व्यसनाच्या चक्रव्यूहात मात्र
तो मोहाचा बळी ठरला..!!

: :
व्यसनाच्या चक्रव्यूहात मात्र
तो मोहाचा बळी ठरला..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| उचकी ||

चला थोडे हसवू
अन थोडे हसु..
मनाच्या चकव्यात..
अलगद फसु..!!
=D ====== =D
|| उचकी ||
=======
😄😜😄
उचकीची फ्रिक्वेन्सी
वाऱ्याच्या लहरीवर
स्वार होऊन येते..
अन..
स्मृतीच्या कॅमेऱ्यात
मनाच्या फाईलीत
चित्रफीत सुरु होते..

शाशंक मन
सतत प्रश्न विचारले
ही का ती..का ती..??
च्यामारी
नक्की कोण
आठवण काढते..
उचकी लागली की,
आमचं हे असं होते..!!
***$p..✍🏽
😄😜 

|| होईल कधीतरी ||

|| होईल कधीतरी ||
============
पूर्वी,
खुंटी असायची घरात
सदरा का पेहराव
टांगलेला असायचा..
गुटगुटीत हसरा चेहरा
घरात तसेच अंगणात
रांगताना दिसायचा..!!
आता,
खुंटी बरोबर तो सदराही
दिसेनासा झालाय
बहुतेक तो सुखाचा असावा..
पिचलेल्या चकचकीत घरात
शोधता सापडत नाही
तो सदरा अन तो चेहराही
जीव घुसमटू लागलाय
हास्य कुठे लपलंय
कळेना तो सदरा
कुठे बरे ठेवला असावा..??

पूर्वी,
घराच्या भिंतीत
एक छोटीशी सान असायची
नाव जरी सान असले
तितकीच महान भासायची..
कधी मंद दिवा तेवायचा तिथे
वा कधी कुठेही न सापडणारी
विस्मृतीतील इवलीशी (गोष्ट) वस्तू
हमखास तिथेच दिसायची..!!

आता,
त्या सानीबरोबर हरवल्या
असंख्य
हव्याहव्याशा वाटणाऱ्या
आपुलकीच्या गोष्टी
तो जपलेला अनमोल मनाचा ठेवा
अन मंद तेवणारा तो दिवा..
हरवलेल्या हृदयाने मी
कुठवर शोधावा आता
तो हळव्या मनाचा कप्पा..?
पण आशा आहे अंधुकशी अजूनही
कुठेतरी सापडेल तिथली वाट
अन होईल कधीतरी
निर्भेळ माणुसकीची पहाट..!!
****सुनिल पवार..

|| तिच्या छोट्याशा भावविश्वात ||


· 
|| तिच्या छोट्याशा भावविश्वात  ||
=====================
तिच्या छोट्याशा भावविश्वात
ती नेहमीच मशगुल दिसते..
तिच्या राऊळातील देवासाठी
ती गंधाळणारं फुल असते..!!
काटयांनी घेरलेले विश्व तिचे
ती त्यातूनही सहज बहरते..
उन्ह, वारा, पाऊस सोसत
ती सदाफुलीचं रूप धरते..!!
कितीदा खुडली,अकाली विझली
ती समईतली निरंतर वात बनते..
अंधार सारा शोषून अंतरात
ती प्रकाश चिरंतर जगास देते..!!
अनंत घाव सोसते उरात
ती वेदनेशी नाते निभावते..
साऱ्या विश्वाचीचं पालनहार
ती धरा हिरवी सर्वांस पोसते..!!
पण प्रश्न हाचं मागे उरतो
ती तरीही का उपेक्षित राहते..?
बदलावयास हवे तिने स्वतःसही
ती जगास साऱ्या बदलू शकते..!!
*****सुनिल पवार....✍🏽

Monday, 17 October 2016

|| उकळी ||

|| उकळी ||
========
उकळी फुटली दुधाला
अन
ओसंडून वाहू लागले
दूध
भांड्यातुन
विलग होऊ लागले
खरं सांगायचं तर
वाया जाऊ लागले..!!


चिंता नाही दिसत
कोणालाच त्याची
समजत असतील
उरलेलं दूध
निवांत पिता येईल
पण मेख आहे खरी
त्या आगीत
कळणार नाही कोणास
ती सर्वच कधी
जाळून जाईल..!!

उरलच जरी चुकून
दूध किंचितसेही
त्यासाठी
मिठ घेऊन कोणी
तयारच असेल
कधी फाटेल दूध
समजणार नाही
इथे
शक्यता कोणतीही
नाकारता येत नाही..!!
***सुनिल पवार..✍🏽

|| कागद/लेखणी ||

|| कागद/लेखणी ||
===========
तिच्या मौनाचा संवाद
त्याने केलाय आत्मसात..
तिच्या ओघळणाऱ्या अश्रूस
त्याने सामावलंय हृदयात..!!


तिच्या सुखात दुखाःत
निरंतर त्याची साथ..
तिची प्रत्येक भावना
त्यानेच मांडली शब्दात..!!

सचैल न्हाहतो तो
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात..
विहंग विहारतो तो
तिच्या स्वप्नांच्या उत्तुंग आकाशात..!!

टंकार असतो तो
तिने उगारल्या आसुडाचा..
झंकार होतो तोच
तिने गुंफलेल्या भावनांचा..!!

तिचा शब्द झेलायला
तो नेहमीच दिसतो तत्पर..
नाभीतली कस्तुरी ती
तो दरवळणारे अत्तर..!!

युगायुगांची ही त्यांची
निस्सीम प्रेम कहाणी..
तो प्रियकर वेडा कागद
ती सुंदर प्रियतमा लेखणी..!!

|| कधी वाटते ||

|| कधी वाटते ||
==========
हे घडतंय नक्की
का घडवतयं कोणी..?
काय असेल नेमकी
त्याच्या मागची कहाणी..!!


कोणी पेटवली गंजी
झाली भावनांची होळी..
कळवंडले आकाश
कोण शेकतोय पोळी..!!

कुठे विरला आवाज
कोण बांधील अंदाज..
शांततेचा चढविला
कुणा वादळाने साज..!!

काय फलित तयाचे
कोणी केव्हा शिकायचे..
काय वाटून घ्यायचे
काय सोडून द्यायचे..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| निव्वळ टाईमपास ||

|| निव्वळ टाईमपास ||
==============
😜😄😜😄
ती : अरे किती दिवसांनी..?
काय..! कसा आहेस..?
तो : कसा असणार..?
वाळवंटात नाही पाण्याचा लवलेश..!!
😄=====😄
ती : हम्म, तरीही..
पण काही तरी असेल ना विशेष..?
तो : हो, आता उरलेत मागे
मोजकेच अवशेष..!!
😜=====😜
ती : अच्छा..म्हणजे
काहीतरी आहे तर शेष..
तो : म्हटलं तर हो
पण शाश्वती नाही,
कधी होतील निःशेष..!!
😄=====😄
ती : का ओसरला रे
इतक्यात उन्मेष..?
तो : जळून गेला केव्हाच
तो नजरेतला द्वेष..!!
😜=====😜
ती : काळजी नको,
आता धूसर झालीय रेष..
तो : हो, पण ओलांडून झालीय ना
कधीची वेस..!!
😄=====😄
ती : मग बघ माझ्याकडे
अन बदलून घे तुझा वेष..
तो : केव्हाच बदललाय, उतरवलं तारुण्य,
लपवले कळपात पांढरे केस..!!
😩=====😩
ती : हम्म, चल मी निघते,
बरीच काम आहेत शेष..
तो : बरं..भेटत जा अधून मधून,
पाठव व्हाट्सअप वर संदेश..!!
*****$p.....✍🏽😄