Monday, 24 October 2016

|| तिच्या छोट्याशा भावविश्वात ||


· 
|| तिच्या छोट्याशा भावविश्वात  ||
=====================
तिच्या छोट्याशा भावविश्वात
ती नेहमीच मशगुल दिसते..
तिच्या राऊळातील देवासाठी
ती गंधाळणारं फुल असते..!!
काटयांनी घेरलेले विश्व तिचे
ती त्यातूनही सहज बहरते..
उन्ह, वारा, पाऊस सोसत
ती सदाफुलीचं रूप धरते..!!
कितीदा खुडली,अकाली विझली
ती समईतली निरंतर वात बनते..
अंधार सारा शोषून अंतरात
ती प्रकाश चिरंतर जगास देते..!!
अनंत घाव सोसते उरात
ती वेदनेशी नाते निभावते..
साऱ्या विश्वाचीचं पालनहार
ती धरा हिरवी सर्वांस पोसते..!!
पण प्रश्न हाचं मागे उरतो
ती तरीही का उपेक्षित राहते..?
बदलावयास हवे तिने स्वतःसही
ती जगास साऱ्या बदलू शकते..!!
*****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment