|| भेट ||
=====
वाटेवरती भेट घडली
गुंतलेल्या दोन मनांची..
उलघडली सुप्त कवाडे
ज्ञात, अज्ञात क्षणाची..!!
=====
वाटेवरती भेट घडली
गुंतलेल्या दोन मनांची..
उलघडली सुप्त कवाडे
ज्ञात, अज्ञात क्षणाची..!!
पाकळ्यांनी मौन सोडले
मोरपीस तलम फिरले..
आगंतुक सल काट्याची
पाणी झरझर झरले..!!
काल घडली होती घटना
आज अंतरी गहिवरले..
आठवांनी केली गर्दी
सभोवताली फेर धरले..!!
विलग होता मन मनातून
यातना मनास झाल्या..
वाटेवरच्या वाटसरूंनी
वाटा आपल्या विलग केल्या..!!
***सुनिल पवार.......✍🏽
मोरपीस तलम फिरले..
आगंतुक सल काट्याची
पाणी झरझर झरले..!!
काल घडली होती घटना
आज अंतरी गहिवरले..
आठवांनी केली गर्दी
सभोवताली फेर धरले..!!
विलग होता मन मनातून
यातना मनास झाल्या..
वाटेवरच्या वाटसरूंनी
वाटा आपल्या विलग केल्या..!!
***सुनिल पवार.......✍🏽

No comments:
Post a Comment