Tuesday, 4 October 2016

|| शब्द आत्मघातकी ||

|| शब्द आत्मघातकी ||
===============
मातीचं नातं सांगणारे
भाविष्याच्या भावविश्वात रमणारे
सखीच्या प्रेमात,
विरहाच्या डोहात अखंड बुडणारे
भौतिक घटनांवर परखड
पण तटस्थ बोलणारे
शीतल शांत माणसाळलेले
माझे शब्द
आता विस्तावाशी खेळू लागले..
एकमेकांवर चिखल फेकत
डुकरासारखे लोळू लागले..!!

आकलनाच्या पलीकडे चाललेत शब्द
कोणाचा पायपोस कशात नाही
शब्दांच्या पलीकडचा हा खेळ
शब्दांनाही पेलत नाही
वाह्यात झाले सारेच शब्द
आपल्याच तोऱ्यात मिरवू लागले
आत्मघातकी त्यांचं हे पाऊल
त्यांनाही तसे कळणार नाही
कारण एकही शब्द आता
माझ्या कह्यात राहिला नाही..!!
****सुनिल पवार..

No comments:

Post a Comment