Monday, 10 October 2016

|| इतके दिवस ||

|| इतके दिवस ||
==========
इतके दिवस
मी तिला
पाहत होतो
तिचं आज
लक्ष गेले
माझ्याकडे
अन
थांबली ती
जवळ आली
म्हणाली..
हाय..!
तू खेळत नाहीस..?
म्हटलं मी
नाही गं
जेव्हा पासून
तू बदलला सवंगडी
तेव्हा पासून
फक्त
पाहण्यात मानतोय
मी धन्यता..!!
**सुनिल पवार...✍🏽 


No comments:

Post a Comment