Monday, 10 October 2016

|| बोभाटा होण्याच्या आत ||

बोभाटा होण्याच्या आत..
तिची साद ऐकून
तो तिच्यासाठी धावून आला।
आपल्या प्रेम वर्षावात
चिंब चिंब भिजवले तिला।
तिच्या आतुर बाहुपाशात
तो देहभान विसरला।
अन् मोहरली ती सुद्धा
गंध चहुओर उधळला।
कैद झाला तो नकळत
तिच्या बहरणाऱ्या देहबोलीत।
तिने सामावले त्यास
काळजाच्या खोल खोलीत।
सांभाळू लागला तो आवडीने
तिची बागडणारी चिल्लीपिल्ली।
गुंतला तिच्या संसारात अन्
खेळवू लागला वृक्ष आणि वल्ली।
आता निघता निघेना पाय त्याचा
तो इतका रमलायं तिच्या संसारात।
पण त्याच्या ह्याच वास्तव्यावर आता
कुजबुज चाललीय माणसामाणसात।
वाटते निघावं त्याने आता
चारचौघात बोभाटा होण्याच्या आत।
सावध व्हावं त्यानेही वेळीच
कारण वेळ लागणार नाही
त्याच्या प्रेमाचं लफडं होण्यात।
प्रेम कोणाचंही का असेना
त्याचं लफडंच होतं माणसात।
तसा माणूस पूर्वपार आहे
नावं ठेवण्यात भारी निष्णात।
--सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment