Tuesday, 4 October 2016

II आवाज बुलंद व्हावा II

II आवाज बुलंद व्हावा II
===============
कुत्रे बरे हो ह्यांच्यापेक्षा
खाल्ल्या मिठास तरी जागतात..
सत्तेचे अन प्रसिद्धीचे लाळघोटे दलाल
आपल्याच देशाचे धिंडवडे काढतात..!!


आपल्या बेताल वक्तव्यांनी ते
माकडाच्या हाती कोलीत देत आहेत..
पण माहीत नाही त्या मुर्खांना
जळुन जातील स्वतःच
ते विस्तवाशी खेळत आहेत..!!

सीमेवर शाहिद होतोय जवान
प्रत्येक देशभक्तांच्या उरी धडधडते..
मस्त(केजरी)वाल,तरी(निरू)पण(पम)
खानावळीत
यत्किंचितशी साली पुरीही तडतडते..!!

ढासळणाऱ्या ह्या नीतिमत्तेला
सांगा कोणी व कसा आवर घालावा..
देशापुढे ना कोणीच मोठे
हा एकमेव आवाज बुलंद व्हावा..!!
******सुनिल पवार....

No comments:

Post a Comment