Monday, 24 October 2016

II प्रश्न हाच आहे II

II प्रश्न हाच आहे II
============
प्रश्न हा नाही,
पाणी किती वाहून गेले..
प्रश्न हाच आहे,
अजून किती आहे ओले..!!


प्रश्न हा नाही,
जगणं किती फोल आहे..
प्रश्न हाच आहे,
डोह किती खोल आहे..!!

प्रश्न हा नाही,
क्षणात किती बहर आहे..
प्रश्न हाच आहे,
मनात किती दरवळ आहे..!!

प्रश्न हा नाही,
भावना किती सुप्त आहे..
प्रश्न हाच आहे,
समाज किती मुक्त आहे..!!

प्रश्न हा नाही,
मला किती छळणार आहे..
प्रश्न हाच आहे,
तुला किती कळणार आहे..!!
****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment