Saturday, 27 April 2019

फूलों की तरह...🌺

फूलों की तरह...🌺
ना मेहको तो कोई बात नही
मगर फूलों तो
गुलमोहर के फूलो की तरह..
धारण करो सूरज को
और बिछा दो दिल
कड़ी धूप में छाव बनो
गुलमोहर के फूलों की तरह..!!
सुप्रभात दोस्तो...🌞
***सुनिल पवार..✍🏽

असे जगावे...

असे जगावे...
निसर्गाकडून शिकावे
वृक्षापरी जगावे.
पानगळ मागे सारून
पुन्हा नव्याने बहरावे...!!
सरितेकडून शिकावे
निरंतर वाहत राहावे..
ध्येय प्राप्तीसाठी
मार्ग आपले बनवावे..!!
पाखरांकडून शिकावे
पंखांना बळ द्यावे..
मातीचे पाय राखून
उंच उंच उडावे..!!
चराचराकडून शिकावे
मनी भेद नसावे..
माणसाला माणसाने
माणुसकीने वागवावे..!!
***सुनिल पवार...✍️

जिंदगी.....

जिंदगी.....

जिंदगी जैसे
जलती धूप में तनहा पेड़
फैली हुई शाखाओ में 
ना रहा कोई मेल..
उड़ गए पंछी सारे
खोकली हो गई जड़े
अब तो सूखे पत्तों की तरह
आँसू बहाए जिंदगी
न जाने कौनसा खेल?
खेल रही है यह जिंदगी..!!
***सुनिल पवार...✍️

नदी. के दो किनारे..

नदी. के दो किनारे..

नदी के दो किनारे हम
साथ तो चलते है
मगर मिल नही पाते हम..
बहती धारा है यह जीवन
क्या पता 
कहा ले जाएंगे कदम..!!
क्यों ना?
दिलों का बाँध डाल के
इस बहती धारा को
रोक कर रखे
ताकि कुछ क्षण ही सही
मिलन के इस ऐहसास को
महसूस करे हम..
नदी के दो किनारे है हम..
साथ तो चलते है
मगर मिल नही पाते हम..!!
यह ना समजना के
थमने वाला
कभी जीवन नही होता
गर ऐसा होता
तो पानी को कौन जीवन कहता
कुछ पल ठहर जाते है
इस मोड़ पर फिर से हम..
नदी के दो किनारे हम..
साथ तो चलते है
मगर मिल नही पाते हम..!!

पुस्तकी मस्तके...

पुस्तकी मस्तके...
धूळ झटकून
आज सारी पुस्तके
नव्याने बाहेर पडली..
ज्ञात, अज्ञात
उपयोगी, निरुपयोगी
सौम्य, दाहक
पाने गळलेली
वाळवी लागलेली
जीर्ण मालिन झालेली..!!
तर काही तशीच
कोरी करकरीत
घडलेली अन् घडवणारीही
मग सृजन असो
की असो सर्वनाश
अशी कितीतरी मस्तके
त्यांनीच तर आहेत घडवलेली..
काही तुम्ही वाचलेली
तर काही मी वाचलेली..!!
***सुनिल पवार...✍️

का कुणास ठाऊक..

का कुणास ठाऊक..
का कुणास ठाऊक
हल्ली भरलेली ओंजळही
रीती रीती भासते..
दोन दिशेला दोन हात
सुटण्याची भीती वाटते..??
का कुणास ठाऊक
निरभ्र दिसणाऱ्या आकाशात
अवेळी मळभ दाटून येते..
अन् फाटलेले मनाचे छप्पर
गळण्याची भीती वाटते..!!
का कुणास ठाऊक
अबोल आहे वारा तरीही
धूळ उसळून उठते..
अन् पेल्यातील वादळाने
उद्धवस्त होण्याची भीती वाटते..!!
का कुणास ठाऊक
जुळून आलेल्या समीकरणाचे
उत्तर मात्र चुकत जाते..
माझ्या बेरजेच्या सूत्रास
तुझ्या वजाबाकीची भीती वाटते..!!
***सुनिल पवार...✍️

वेळावेळ..

वेळावेळ..
एखाद्याकडे वेळ असूनही वेळ मुळीच नसतो..
निदान तो तरी तसेच भासवत असतो..
तर एखाद्याकडे वेळेची कमतरता असूनही त्याचा वेळ जात नसतो..
पण हे त्याला दाखवायची आवश्यकता नसते तर ते सहज दिसून येत असते..
कारण त्या व्यक्तीशिवाय त्याला खरोखर करमत नसते..
एखाद्याच्या कोणी समक्ष असूनही तो कोणाला टाळत असतो..
त्याच्या मागची भूमिका अशी असते की, तो त्याला कंटाळलेला असतो..
तर एखादा कोणी दूर असल्याकारणाने कोणासाठी वाट पाहत ताटकळत असतो..
पण त्या मागची भूमिका म्हणजे त्या व्यक्तीचा त्याच्यावरचा प्रभाव असतो..
समजून तर हेच घ्यायचे असते की,
लोक त्यांच्या सोयीनुसार एखाद्याचे मोल ठरवत असतात..
म्हणूनच आपणच आपले मोल कधी कमी करायचे नसते..
वेळेचं काय.. ती तर येत जात असते..
पण तीच वेळ एखाद्याचे खायचे आणि दाखवायचे दात
सहज दाखवून देत असते..!!
धन्यवाद..
सुनिल पवार..✍️

रंग,अंतरंग...

रंग,अंतरंग...

रंग बदलण्याची
का गरज पडत असावी माणसाला..
प्रत्येकजण 
का भुलत असतो वरवरच्या रंगला..!!
मग कधीतरी
त्यानेही पाहावे अंतरंगात डोकावून..
कोणीतरी असतोच
त्यावरही प्रेम करणारा तसाच झोकून..!!
***सुनिल पवार...✍️

खेळ...

खेळ...
नाही,
तू खुशाल खेळ
माझी मनाई नाही
खेळ खेळायला..
पण निदान
खेळणं आणि हृदय
यातील
अंतर तर हवं ना
तुला कळायला..!!
**सुनिल पवार..✍️
v

दाखवून दे..

दाखवून दे..
मला कळत नाही
तुझ्या अवकाळी येण्याला
काय अर्थ असतो..?
सांगशील का जरा,
त्यात कोणता स्वार्थ असतो..??
उगाच परमार्थ साधल्याचा
तू आव आणू नको..
अन् माझ्या संयमाचे धनुष्य
तू नाहक ताणू नको..!!
आता स्वागत तर दूर
पण तुझ्याकडे
ढुंकूनही पाहणार नाही..
आटून गेलेल्या झऱ्यातून
पाण्याचा थेंबही वाहणार नाही..!!
तुला यायचंच असेल पुन्हा
तर ऋतूंना सोबत घेऊन ये..
माझ्या नजरेतले इंद्रधनुष्य
तुझ्या आभाळी लेवून घे..!!
जमलंच तर पुसून दाखव
माथ्यावरचा अवकाळी शिक्का..
उगाच वरपांगी सोंग नको
दाखवून दे कृतीतून,
इरादा आपला पक्का..!!
***सुनिल पवार...✍️

अर्धवट प्रवास...

अर्धवट प्रवास...
नयनरम्य सारेच
मृगजळी सहवास..
गुलाबी पायघड्यांवर
तुटलेले विश्वास..!!
ओलावल्या डोळ्यांतून
चातकाची आस..
थेंबभर पाण्यासाठी
लागलेला ध्यास..!!
पण व्यर्थ लावलेले
अस्तित्वाचे कयास..
अनभिज्ञतेच्या मागे
लोपलेले सायास..!!
रेशमी पाशातले
ते घुसमटलेले श्वास..
अन् सुटलेल्या हातांचे
होते अर्धवट प्रवास..!!
**सुनिल पवार...✍️

तेच मन..

तेच मन..
लहानपणी गाडीत बसल्यावर
आजूबाजूची झाडे दूर जाताना पाहून
कोण हर्ष व्हायचा
अन् मन आनंदाने फुलून यायचे..
पण न जाणे
आता कोणत्या गाडीत बसलोय
अनुभूती तीच झाडांसारखी
परंतु, तुला दूर जाताना पाहून
तेच मन
कोमेजल्याचा भास होतोय..!!
***सुनिल पवार...✍️

गणित..

गणित..
काही मान्य
तर बरेच अमान्य..
आयुष्याचे गणित
तसे नाही सामान्य..!!
काही गम्य
तर बरेच अगम्य..
किती मिळवले
पण उरले शून्य..!!
**सुनिल पवार..✍️

दूर तिथे..

दूर तिथे..
किती
जवळ होतो
पण 
जाणवले नाही कुठे
लाट येते लाट जाते
मी इथे तर
तू दूर तिथे..!!
सूर्य
अस्तास चालला
सावल्याही लांबल्या
पाऊल खुणा उरल्या
ओळख
कोणाचे कोण ते
मी इथे तर
तू दूर तिथे..!!
**$p..✍️

दोन कारणे...

दोन कारणे...
वचनाला न जागण्याची
दोन कारणे असू शकतात
एक.. 
विपरीत परिस्थितीचा प्रभाव
आणि दुसरा..
इच्छाशक्तीचा अभाव..!!
**सुनिल पवार..✍️

मतदान..

मतदान..
निवडणुकीच्या प्रक्रियेला
मतदान न म्हणता
मतऋण म्हंटले पाहिजे..
मग निवडून येणाऱ्या नेत्याने
स्वतःचा विकास न करता
देशाचा विकास करून
ते परिश्रमच्या व्याजासह
मनापासून फेडलं पाहिजे..
तेव्हाच कुठे
या प्रक्रियेला खरा अर्थ येईल
आणि
खऱ्या अर्थाने
त्याला मतदान म्हणता येईल..!!
***सुनिल पवार...✍🏽

जगणे...

जगणे...

दिसणे आपल्या हाती नसते
पण असणे तर असते..
पण तरीही भासाच्या चकव्यात
मनाचे फसणे हे असते..!!
गरजणे आले की मग
बरसणेही ओघानेच येते..
पण तरीही एखाद्या पुंजक्यावर
हतबल विसंबणे हे असते..!!
जसे उगवणे असते ना
तसेच ते मावळणेही असते..
पण तरीही उन्ह सावलीसाठी
वेळोवेळी झगडणे असते..!!
जगणेही असेच असते
ते मरणकळा घेऊन येते..
पण तरीही त्या क्षणासाठी
मनी हेलकावणे हे असते..!!
***सुनिल पवार...✍️

Wednesday, 10 April 2019

मौनाचे अर्थ..

मौनाचे अर्थ..
हल्ली,
मी हरवून जातो
माझ्याच शब्दात..
पण तुच असतेस
त्यांच्या भावविश्वात..!!
तरीही
तू बोलत नाही अन्
शब्द विरून जातात..
सांग तुझ्या मौनाचे
अर्थ तरी काय असतात..!!
**सुनिल पवार...✍️