Wednesday, 10 April 2019

का कळेना...

का कळेना...
का कळेना,
हल्ली संवाद खुंटत जातोय..
प्रत्येकजण प्रत्येकाला
स्वार्थाच्या चष्म्यातून पाहतोय..
स्माईलीची भाषाही
हल्ली पचनी पडत नाही
शब्दांचे हे लेणे
का वेळेचा अपव्यय वाटतोय..
गोष्ट केवळ तुझी नाही
मीही हल्ली तसाच वागतोय..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment