Thursday, 4 April 2019

एकांत...

एकांत...
हल्ली
आपल्याच मनाशी,
आपले वाद होतात
न घडणाऱ्या संवादाचे
नकळत पडसाद उमटतात..
मग मीच वादी होतो,
मीच फिर्याद करतो
आणि मीच दाद मागतो
मनाच्या कटघऱ्यात
मीच उभा राहतो
नसलेल्या न्यायालयात
माझी शिक्षा मलाच सुनावतो
अन् नको असलेला
हा एकांत
नकळत माझ्या वाट्यास येतो..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment