Thursday, 4 April 2019

शेवटी दगडच तो...

शेवटी दगडच तो...
तुला
दगडाचे न विरघळणे कळते
पण त्याचे
कणाकणाने झिजणे दिसत नाही..
शेवटी
दगडच तो वाटेवरचा
तो तसंही काहीच बोलत नाही..!!
सोन्याचा सोस असतो ज्याला
त्याची नजर
सहसा पायरीवर पडत नाही..
तू खुशाल जा तुडवून त्याला
शेवटी
दगडच तो वाटेवरचा
तो तसंही काही बोलत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment