Tuesday, 28 April 2015

।। गाडी यु ही चलती है ।।

।। गाडी यु ही चलती है ।।
*********************
निडर बनो, लीडर बनो
कानो को सुकून देता है..
बेहरा है जमाना
कौन किसी की सुनता है..!!

बोलने वालो को यहाँ
लोग पागल कहते है..
मुह मे ताला जिनके
तिजोरी उसे समजते है..!!
निकाला हूँ लेकर आईना
लोग अनदेखा करते है..
दुसरो के गिरेबां में मगर
अक्सर झाकके देखते है..!!
चिल्लाते रहते हम
लोग अनसुना निकलते है
दिल बात अब हम
दिल को ही सुनाते है..!!
चला हूँ बदलने दुनिया को
दुनिया कहा रुकती है..
रोज नए स्टेशन जुड़ते
गाडी यु ही चलती है..!!
*****सुनिल पवार.....

|| सावर रे निसर्गाला ||

|| सावर रे निसर्गाला ||
*******************
नको भजु मला
तू नको पुजू मला
माणूस म्हणून जन्मला
निदान जाग तू ब्रीदाला..!!

दिले तुज निसर्गाने
आभार त्याचे मान
काढून घेतले त्याने
कारण त्याचे जाण..!!

घडले काही अप्रीय
कोसतो तू मला
करणी तुझीच सारी
दोष का देवाला..!!

धड़ा गिरवत विज्ञानाचा
तू अज्ञानच दावीले
प्रगती म्हणता म्हणता
तू अधोगतीस नेले..!!

पृथ्वी, सागर, आकाश
तू कुणास न सोडले
हव्यासा पोटी तुझ्या
तू सारेच ओरबाडले..!!

पृथ्वीच्या छाताङावर
थडगे तूच उभारले
श्वास घेण्या मोकळा
सांग झाड़ कुठे उरले..!!

दिसतो तुज देव माणसात
दिसत नाही का निसर्गात
रुचत नाही रे मला
आपमतलबी तुझी बात..!!

नको पुजू मला
तू नको भजु मला
अजुन वेळ गेली नाही
सावर रे निसर्गाला..!!
तू सावर रे निसर्गाला....
*****सुनील पवार.....

Sunday, 26 April 2015

|| दे बळ नवे पुन्हा जगण्याला ||

|| दे बळ नवे पुन्हा जगण्याला ||
*************************
पुसून मनाची काळी शाई
लिहतो आता नव्याने काही..
खेळत होतो कुशीत तुझ्या
कोपलीस का तूही आई..!!
सुंदर किती तू नटली होती
दृष्ट लागली कुणाची तुला..
कंपन का असे शरीराला
कसला राग आलाय तुला..!!
रुजले होते बिज उदरात
का पुन्हा घेतले तू पोटात
आक्रोश मागे भरून राहिला
हास्य विरले सारे ओठात..!!
आवर आता तुझ्या क्रोधाला
जाग माते ज़रा ममतेला..
अज्ञानी आम्ही तुझी लेकर
दे बळ नवे पुन्हा जगण्याला..!!
********सुनिल पवार........
(भावपूर्ण श्रद्धांजली)

Saturday, 25 April 2015

।। शक्य/अशक्य ।।

।। शक्य/अशक्य ।।
***************
अशक्यतेच्या मागे
शक्यता दडलेली असते..
आपणास मात्र ती
पडताळून पहायची असते..!!

हात पाय गाळुन
कधी बसायचे नसते..
जगात अशक्य असे
मात्र काहीच नसते..!!

जे काही असते
कच खाऊ धोरण असते..
आपल्याच प्रगतीला
ते मारक ठरते..!!

विचार पूर्वक मात्र
पाऊल टाकायचे असते..
आपल्याच हातात मात्र
आपले भविष्य असते..!!
******सुनिल पवार.....
******शुभ सकाळ******

Friday, 24 April 2015

।। अंधार रात्रीचा ।।

 ।। अंधार रात्रीचा ।।
****************
रात्रीच्या अंधारास,
लोक उगाच नावे ठेवतात..
होता आधार मग,
हळूच कानी कुजबुजतात..!!

चद्राच्या शितलतेचे,
तेच गुणगाण करतात..
शीतल चांदण्यात मग,
सचैल स्नान करतात..!!

रात्र असते जशी शहाणी,
खट्याळ ज़रा, जराशी वेडी..
चंद्र कला जैसी वाढे,
उत्कंठ प्रेमाची मधुर गोडी..!!

चंद्राच्या चांदण्यांच्या साक्षीने,
आणा भाका घेतात..
मग कशास उगाच ,
लोक रात्रीवर डाफरतात..!!

पाप वसे ज्याच्या मनात,
लपवु पाहे तो काळोखात
थकला भागला जीव पहा,
निजला कसा शांत निवांत..!!
*******सुनिल पवार......

Tuesday, 21 April 2015

।। ही तर आहे लोकशाही ।।

|| ही तर आहे लोकशाही ||
**********************
बाजारात फोफावतेय महागाई
शेत मालास भाव नाही
विरोधाभास म्हणायच नाही
ही तर आहे लोकशाही..!!

नदी नाल्यात पाणी नाही
बाटल्यामधून पूर वाही
टँकर लॉबीचा दोष नाही
ही तर आहे लोकशाही..!!

शेती करण्यास जमीन नाही
अधिग्रहणाची त्यात घाई
दरोड्याची ती केस नाही
ही तर आहे लोकशाही..!!

अवकाळी काही जात नाही
मदतीचा कुठे हात नाही
इच्छा शक्तिची बात नाही
ही तर आहे लोकशाही..!!

गरीबास कोणी वाली नाही
श्रीमंत इथे सवाली नाही
दरी म्हणायच काम नाही
ही तर आहे लोकशाही..!!

लोकांनी केलेले राज्य नाही
लोकांसाठी तर मुळीच नाही
मोजकेच लोक असती शाही
ही तर आहे लोकशाही...!!
*******सुनिल पवार........

Monday, 20 April 2015

|| जात ||

|| जात ||
********
रहात नाही आग विस्तावात
परी जात नाही जात..
जातीच्या त्या कुबड्या
मजला मिळाल्यात जन्मजात..!!

रांगतोय मी आता कुबड्यांवर
जातीचाच येतोय गहिवर
काढेल कोणी ब्र जातीवर
राग माझा होतोय अनावर..!!

चोऱ्या होतात आता जातीच्या
हातोहात लोक डल्ला मारतात
नावे ठेवत मग जातीला
त्या जातीचेच होवून जातात..!!

सोडा जात बदला विचार
वाचतोय नित्य पुस्तकात..
वाहतोय मी त्याच प्रवाहात
ठेवून जात मस्तकात..!!
******सुनिल पवार......

।। भावना ।।

।। भावना ।।
***********
चुरगळतात कधी भावना जिथे
अश्रु तिथे नकळत ओघळतात..
मनात दाटल्या भावनांना
वाट मोकळी करून देतात..!!

कळतात कुणा भावना जिथे
अश्रु तिथे फुले बनतात..
दरवळतात ती गहिवरून
अन मनास उभारी देतात..!!

कोरडया होतात भावना जेव्हा
अश्रु तिथे ज्वालामुखी बनतात...
कहर तयाचा लाव्हा बनून
निष्पापांचाही बळी घेतात..!!

म्हणूनच सांगतो मित्रांनो

खेळू नका खेळ भावनांचा
विचार करा प्रत्येक मनाचा
दरवळू दे गंध फुलांचा
जपा वारसा सदभावनांचा..!!
*****सुनिल पवार.......

Sunday, 19 April 2015

।। आई / बाबा ।।

|| आई / बाबा ||
********
मायेच्या स्पर्शासाठी
मन अजूनही आसुसते..
मुलांच्या हर्षासाठी
आई चंदनापरी झिजते..!!
बाबांची ही कहाणी
वेगळी कुठे असते
वट वृक्षाचे मूळ जसे
खोल रुजुन असते..!!
छाया आणि सुगंधाचे
सौख्य आपणास मिळत असते...
आई बाबांच्या सहवासात
जीवन आपले फुलत असते..!!
******सुनिल पवार....

Friday, 17 April 2015

।। तारे ।।

।। तारे ।।
**********
आकाशातले तारे मज,
सांगुन गेले सारे..
लुकलुकत्या रुपास,
कसे भुलतात सारे..!!


जगतोय का मरतोय,
पर्वा कोणास ना रे..
तुटत्या ताऱ्याकड़ेही
मागणे मागतात सारे..!!

भुलवितात नजरेस
त्यांचे मनोहर नज़ारे..
उघड्या डोळ्यांनीही
स्वप्न पाहतात सारे..!!
*******सुनील पवार.....

II आरसा मनाचा II

II आरसा मनाचा II
********************
न्याहाळत होतो आरशात स्वतःला
नकळत प्रश्न केला मी त्याला..
सांगशील मजला आरशा जरा
तू खरा की मी खरा..?

ओळखून रोख प्रश्नाचा माझ्या
मिश्किल आरसा हसत उत्तरला..
नित्य नवे रूप दाखवून मजला
का फसवू पाहतो तूच स्वतःला..??
फसवशील तू कदाचित मला
पण कसे फसवंशील सांग मनाला..?
मनाच्या आरश्यात डोकाव तू जरा
खरे खोटे काय कळेलच तुला..!!
********सुनील पवार......

Monday, 13 April 2015

।। स्वार्थ+अर्थ ।।

।। स्वार्थ+अर्थ ।।


किती जपशील तू माणसा
आपल्या मनाचा रे स्वार्थ..
कळणार तरी तुज कधी
नाजुक नात्याचा रे अर्थ..!!
का चढ़वतो उगा डोळ्यावर
झापड़े अर्थाच्या गुर्मीचे..
कोसळतील क्षणात सारे
डोलारे मदमस्त ऊर्मीचे..!!
का तोलतोस पैशात सारे
शब्द मुखाचे कधी तोलनार..
धन सर्वत्र ना कामी येणार
पण शब्दांनी तू जग जिंकणार..!!
तसे कळतेय तुला सर्व काही
पण वळत का नाही मग..
उर्जित ठेव मनास आपल्या
विझण्याआधी तनाची धग..!!
--सुनिल पवार..

।। इंद्रधनु ।।

।। इंद्रधनु ।।
***********
जग जरी एक..
त्यातील माणसे अनेक..
माणसे जरी अनेक..
तयांचे चहरेही अनेक..
चेहरे जरी अनेक
त्याचे पैलू अनेक..
पैलू जरी अनेक
तयातील काही नेक..
काही जरी नेक
तरी काही दिलफेक....
सृष्टित असे भरून
रंग ते अनेक..
अनेक त्या रंगांचे..
जसे इंद्रधनु एक..!!
****सुनिल पवार....

II माझ्याच वाटा चालतो मी II

II माझ्याच वाटा चालतो मी II
**********************
 मनुष्य म्हणून जन्म घेतला
संकेत तयाचे पाळतो मी..
माणुसकीला धर्म मानत
माझ्याच वाटा चालतो मी..!!

थोपवू पाहती क्षण मोहाचे
गंडा त्यांस ही घालतो मी..
तुडवीत मार्ग भले काट्याचे
माझ्याच वाटा चालतो मी..!!
सल्ले कोणी दिले अनाहूत
शब्द त्यांचा ही झेलतो मी..
शब्दांना मग तोलत मोलत
माझ्याच वाटा चालतो मी..!!
हिणवीता कधी कोणी मजला
पांघरून तयावर घालतो मी..
कोणी निंदा वा कोणी वंदा
माझ्याच वाटा चालतो मी..!!
**********सुनिल पवार.....

II विठू माउली II

II विठू माउली II
****************
काया वाचे तन
पांडुरंगी ध्यान
द्यावे वरदान
मजलागी..!!

तूच माझी तृष्णा
तूच माझी भूक..
आहे सर्व सुख
भजनात..!!
अंतरी वसावा
विठू पांडुरंग
घड़ो नित्य संग
पांडुरंगा..!!
विसर न व्हावा
तुझा कधी देवा..
देह हां पडावा
चरणाशी..!!
******सुनील पवार...

Wednesday, 8 April 2015

II सुख /दुखः II

II सुख /दुखः II
***************
गुलाब फूलते काट्यात..
कमल ते चिखलात..
तसेच आपले जीवन
बहरते सुख दु:खात..!!

जगावे तर सकारात
निष्पन्न नाही नकारात..
कशास नुसते आभास
सुख लपलय वास्तवात..!!

असू दे निरंतर ज्ञात
व्यर्थ नसावी भ्रांत..
एका शब्दाचे अंतर..
असते सुख दु:खात..!!

नसावे किल्मिष मनात..
माणूस असावा माणसात..
सुख नाही हो स्वार्थात..
परमार्थ तो समाधानात..!!
**********सुनील पवार....



Tuesday, 7 April 2015

।। तमा ।।

:::।।तमा ।।:::
************
का बाळगशी अंधाराची तमा..
बांध नव्याने आयुष्याचा समा..
जगी नसतो कोणीच कोणाचा..
कशास धरावे मग कोणा जमा..!!

शीते तेथे भूते जमती..
ऐश्वर्यात इथे सारेच रमती..
नसतो कोणी साथी संगती..
त्याच चुली अन तीच माती..!!
का द्यावा मग दोष नशिबाला..
का कोसावे असे दैवाला..
मनुष्य जन्म हा पुण्याईचा..
भाग्यवान तो, मिळे ज्याला..!!
बुद्धि बळ तुज सारे असता..
मनगटात तुझ्या जोर असता..
का गाळावे मग हात पाय..
का म्हणावे दे ग माय..!!
भर पंखात बळ जिद्दीचे
घे भरारी नव्या दमाने..
इच्छा तेथेच मार्ग असतो
गाठ शिखर तू नवे श्रमाने..!!
********सुनिल पवार.....

।। गुलमोहर फुलला ग्रीष्मात ।।

।। गुलमोहर फुलला ग्रीष्मात ।।
*************************
नव्हते काही मनात
गवसले ते क्षणात
चांदणे जसे शीतल
अवतरले भर उन्हात..!!

आले समोर मार्गात
लावण्य रत्न साक्षात
लुब्ध मी पाहताच
घायाळ त्या कटाक्षात..!!
अमोघ तेज मुखड्यात
भास्कर झोकाळाला त्यात
शीतल झुळूक वाऱ्याची
होती तीच्या पदरात..!!
मोद तिच्या भेटण्यात
वसंत रुजला मनात
अंथरले ह्रदय पायात
गुलमोहर फुलला ग्रीष्मात...!!
******सुनिल पवार........

।। यादों की बरात ।।

।। यादों की बरात ।।
*****************
हर दिन निकलती है
अब यादों की बरात..
बरबादी के जश्न हम
मनाते है दिन रात..!!

हसकर किये है खाली
कितने गमो के प्याले..
देंगे इस बात की गवाही
गली मोहाल के मधुशाले..!!
अक्सर बातो में होता है
उन्ह लम्हों का ज़िक्र..
करता है अब भी दिल
उस बेवफा का फ़िक्र..!!
ता उम्र मनाएंगे हम
अब जश्न-ए-बरबाद
है दफन सीने में अब
सिर्फ तुम्हारी याद..!!
******सुनिल पवार.......