Monday, 13 April 2015

II माझ्याच वाटा चालतो मी II

II माझ्याच वाटा चालतो मी II
**********************
 मनुष्य म्हणून जन्म घेतला
संकेत तयाचे पाळतो मी..
माणुसकीला धर्म मानत
माझ्याच वाटा चालतो मी..!!

थोपवू पाहती क्षण मोहाचे
गंडा त्यांस ही घालतो मी..
तुडवीत मार्ग भले काट्याचे
माझ्याच वाटा चालतो मी..!!
सल्ले कोणी दिले अनाहूत
शब्द त्यांचा ही झेलतो मी..
शब्दांना मग तोलत मोलत
माझ्याच वाटा चालतो मी..!!
हिणवीता कधी कोणी मजला
पांघरून तयावर घालतो मी..
कोणी निंदा वा कोणी वंदा
माझ्याच वाटा चालतो मी..!!
**********सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment