Monday, 20 April 2015

।। भावना ।।

।। भावना ।।
***********
चुरगळतात कधी भावना जिथे
अश्रु तिथे नकळत ओघळतात..
मनात दाटल्या भावनांना
वाट मोकळी करून देतात..!!

कळतात कुणा भावना जिथे
अश्रु तिथे फुले बनतात..
दरवळतात ती गहिवरून
अन मनास उभारी देतात..!!

कोरडया होतात भावना जेव्हा
अश्रु तिथे ज्वालामुखी बनतात...
कहर तयाचा लाव्हा बनून
निष्पापांचाही बळी घेतात..!!

म्हणूनच सांगतो मित्रांनो

खेळू नका खेळ भावनांचा
विचार करा प्रत्येक मनाचा
दरवळू दे गंध फुलांचा
जपा वारसा सदभावनांचा..!!
*****सुनिल पवार.......

No comments:

Post a Comment