Sunday, 26 April 2015

|| दे बळ नवे पुन्हा जगण्याला ||

|| दे बळ नवे पुन्हा जगण्याला ||
*************************
पुसून मनाची काळी शाई
लिहतो आता नव्याने काही..
खेळत होतो कुशीत तुझ्या
कोपलीस का तूही आई..!!
सुंदर किती तू नटली होती
दृष्ट लागली कुणाची तुला..
कंपन का असे शरीराला
कसला राग आलाय तुला..!!
रुजले होते बिज उदरात
का पुन्हा घेतले तू पोटात
आक्रोश मागे भरून राहिला
हास्य विरले सारे ओठात..!!
आवर आता तुझ्या क्रोधाला
जाग माते ज़रा ममतेला..
अज्ञानी आम्ही तुझी लेकर
दे बळ नवे पुन्हा जगण्याला..!!
********सुनिल पवार........
(भावपूर्ण श्रद्धांजली)

No comments:

Post a Comment