Wednesday, 29 September 2021

जीवन सुंदर आहे

 जीवन सुंदर आहे..


जीवन सुंदर आहे 

ते नित्य पाण्यासारखे वाहते!

कर्माची नाव त्यावरून

सुखदुःखाचा किनारा गाठते!!

--सुनील पवार..✍🏼

*सुप्रभात🌞शुभ सकाळ*

Wednesday, 25 August 2021

मर्म रक्षाबंधनाचे

 || रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

=====================

स्नेहाच्या कोंदनाला

रक्षणाचे कवच असते..


धागे कच्चे जरी

नाते हे अतूट असते..


रक्षा बंधनाचे खरे

हेच मर्म असते..


दूर गेलेलं बालपण

पुन्हा घेऊन येते..!!

--सुनिल पवार...✍🏼

Thursday, 29 July 2021

तू आणि मी

 


 तू आणि मी

आपण रोज सकाळी भेटतो।

चैतन्याचा प्रवाह

तेव्हाच तर संचारतो।


मी श्वासात भरतो तुला

ओठासमीप नेतो।

सकाळचा चहा 

खरंच अमृततुल्य असतो।

--सुनील पवार..✍🏼

🌻सुप्रभात🌞शुभ सकाळ🌻

Tuesday, 27 July 2021

अंकुरू दे बीज

 अंकुरु दे बिज..


तू पुन्हा एकदा आलास 

दुभंगल्या मनावर फुंकर घालायला।

पण किती वेळ थांबणार आहेस?

हे विसरु नको सांगायला।


तडा पडलेल्या मनाला

जरा वेळ लागेल सांधायला।

पण पुन्हा पाठ फिरवलीस तर

जमणार नाही नातं बांधायला।


वाहू दे रे अश्रू जरासे

लागू दे नाद्या वाहायला।

तू सुद्धा थांब जरा 

हा आनंद सोहळा पाहायला।


अंकुरु दे बिज पोटी

लागू दे सहज रांगायला।

कळू दे जगास आता

तू लागला पावसासारखे वागयला।

--सुनिल पवार..✍🏼

Monday, 4 January 2021

ओलावा

 || ओलावा ||

========
जेव्हा,
शब्दांचा ओलावा अपेक्षित असतो
तेव्हा,
नेमका कोरडेपणा वाट्यास येतो..
असा,
नेहमीच माझा अपेक्षाभंग होतो
अन्
ओलावा नकळत डोळ्यातुन उतरतो..!!
--सुनील पवार..

पल दो पल के लिए

 पल दो पल के लिए..

पल दो पल के लिए साथ मिल जाए
काफ़ी है।
यादों के सहारे ज़िंदगी कट जाए
काफ़ी है।
वैसे भी कितनी जरूरतें है इंसान की
कुछ हौसला, कुछ उम्मीदें मिल जाए
काफ़ी है।
--सुनील पवार..


न वाचलेलं पुस्तक

 न वाचलेलं पुस्तक..

तू कधीच वाचलं नाही
मनाचं पुस्तक
नुसतीच पानं पालटत गेली।
तुझ्या पालटण्याच्या नादात
किती पानं चुरगळत गेली।
नाही!
म्हणजे, वाचलेच पाहिजे असेही नाही
पण किमान
शब्द तरी चाळायला हवे होते।
काही नियम अलिखित असतात
त्यांचे संकेत तुला पाळायला हवे होते।
तसं कळतंय मलाही,
हल्ली वेळेअभावी वाचन होत नाही।
पण म्हणतात ना
मानसिकता हवी असते
पण नेमकी
तीच कुठे दिसत नाही।
न पेक्षा एक काम कर
बंद कर ते पुस्तक
अन् फेकून दे अडगळीत अथवा रद्दीत
मला खात्री आहे,
तेच न वाचलेलं पुस्तक
कधीतरी अडीअडचणीत
तुझ्याच कामास येईल
तेव्हा कदाचित
तुला ते वाचण्याचा मोह होईल।
--सुनील पवार.

अभी सुबह होनी बाकी है

 अभी सुबह होनी बाकी है..

ओस की बूंदों की तरह
तुम्हारा आना होता है।
पल में मोती बन जाता है
और पल में बिखर जाता है।
हम चाहकर भी
उनको छू नही सकते।
कभी सपनों से
रूबरू हो नही सकते।
अब तो लगता है जैसे
तुम्हारा अस्तित्व एक छलावा है।
आँख खुलते ही
वो ओझल हो जाता है।
फिर भी कोई शिकायत नही
तुम से
तुम मन को लुभाती हो
बस इतना काफ़ी है।
बेकरार रात गुज़रती है
इंतज़ार में
और मन कहता है
अभी सुबह होनी बाकी है।
--सुनील पवार..

सूर्य मावळलाच नाही तर

सूर्य मावळलाच नाही तर..

सूर्य मावळलाच नाही तर
जीवनात कधी कातरवेळ येणार नाही
असं नाही।
पण इतके मात्र खरे की,
चंद्राचे देखणेपण आणि चांदण्यांचे अंगण
पुन्हा कधी सजणार नाही।
--सुनील पवार..

कल कभी आता नही

 कल कभी आता नही..

क्या रुक नही सकते
पल दो पल।
क्या छुटे हाथ मिल पाएंगे
फिरसे कल।
लोग कहते है की
कल का कोई भरोसा नही।
और हम भी मानते है की
कल कभी आता नही।
--सुनील पवार.

हम चुप बैठे है

 हम चुप बैठे है..

सबकुछ जानते हुए भी
हम चुप बैठे है।
क्यों की,
हम ने देखा नही
मगर हम मानते है
अपने तो अपने होते है।
--सुनील पावर..

आयुष्याचे गणित

 आयुष्याचे गणित..


आयुष्याचे गणित तसे
फारसे कठीण नसते..
बस माणसाने माणसाला
माणुसकीने वागवायचे असते..!!

पण तो उणे करत गेला
जे त्याला नको होते..
अन् तेच मिळवत आला
जे त्याला हवे होते..!!

मग गुणकाराच्या हेक्यात
भागाकार सुटून गेला..
एक्स, वाय, झेड ला
तो दुरूनच भेटून गेला..!!

पण संतुलन जे म्हणतात
तेच बिघडत गेले..
अन् आयुष्याचे गणित
जटिल बनत गेले..!!

मी काय आणि तुम्ही काय
प्रत्येकाचे गणित असेच असते..
कोणत्याही पद्धतीने सोडवा
ते कधीच सुटत नसते..!!

तसे पहायला गेलं तर
गणित वगैरे काही नसते..
आयुष्य म्हणजे केवळ
निखळ जगणे असते..!!
--सुनील पवार..

रात्र निरव

 रात्र निरव..

रात्रीची चाहूल
त्यात एकटे उदास मन।
काही उबदार
तर काही गोठवणारे क्षण।
अपेक्षेत झुळूक
वाहतो बोचरा वारा।
अशांत चित्ताला
कुठे मिळेना थारा।
नजरेत आकाश
मुक्त ताऱ्यांनी सजलेले।
अन् चंद्र एकाकी
क्षण दवांनी भिजलेले।
एक तुटलेला तारा
स्वतःस जाळणारा।
जळता जळताही
इच्छा पूर्ती करणारा।
--सुनील पवार..