आयुष्याचे गणित..
आयुष्याचे गणित तसे
फारसे कठीण नसते..
बस माणसाने माणसाला
माणुसकीने वागवायचे असते..!!
पण तो उणे करत गेला
जे त्याला नको होते..
अन् तेच मिळवत आला
जे त्याला हवे होते..!!
मग गुणकाराच्या हेक्यात
भागाकार सुटून गेला..
एक्स, वाय, झेड ला
तो दुरूनच भेटून गेला..!!
पण संतुलन जे म्हणतात
तेच बिघडत गेले..
अन् आयुष्याचे गणित
जटिल बनत गेले..!!
मी काय आणि तुम्ही काय
प्रत्येकाचे गणित असेच असते..
कोणत्याही पद्धतीने सोडवा
ते कधीच सुटत नसते..!!
तसे पहायला गेलं तर
गणित वगैरे काही नसते..
आयुष्य म्हणजे केवळ
निखळ जगणे असते..!!
--सुनील पवार..
No comments:
Post a Comment