Wednesday, 31 December 2014

II नविन वर्षाच्या वाटेवर II



II नविन वर्षाच्या वाटेवर II
"=●=●=●=●=●=●=●=
नविन वर्षाच्या वाटेवर,
मज नव्याने आता चालायचे आहे..!!
एका नव्या विश्वासाने,
मज अश्वासक पाऊल टाकायचे आहे ..!!

जाती धर्माचे बंध झुगारून,
मज माणुसकीस गाठायचे आहे..
सर्व समतेचे बिज नवे
मज प्रत्येक माणसात वाटायचे आहे..!!
पदोपदी जरी मार्ग काटेरी,
मज फुल त्यातून वेचायचे आहे..
बंद कुपीतील अत्तर सुगंधी,
मज मन मनात सिंचायाचे आहे..!!
उभ्या भिंती जरी दुहीच्या,
मज घर अभेद्य बांधायचे आहे..
दुखावल्या त्या प्रत्येक मना,
मज हळुवारपणे सांधायचे आहे..!!
😊★★★★★★★★😊
******सुनिल पवार..........

Tuesday, 30 December 2014

।। आमच ही नविन वर्ष ।।


।। आमच ही नविन वर्ष ।।
********************
आणखी एक वर्ष सरले
होते जे गरीबीने पिचले
हायसे वाटले मनास आमच्या
पंख त्याचे जे वर्षाने छाटले..!!

आयुष्याचा वनवास आमच्या
आणखी एक वर्षाने कमी झाला
लागलो आम्ही ही आनंदे
मग नववर्षाच्या स्वागताला..!!

तुमच्या सारखी नसते हो
आमची तंग कपड्यातली पार्टी
निळ्या आभाळाची असते रोषणाई
अन उघड़ी बोडकी आमची कार्टी..!!

दारुच्या थेंबासाठी तुमच्याकडे
पाण्यासारखा पैसा वाहतो..
अन पाण्याच्या एका थेंबासाठी
आमचा जीव रोजच तळमळतो..!!

नव वर्षाची नव पहाट तुमची
नशेच्या अंमलाखाली गुजरते
वाट पहातोय अजुनही आम्ही
पहाट आमची कधी सुधरते...!!

जातील सारे तिमिर पळून
फळेल कधी हो आमची इच्छा..
स्वागत करतो आम्ही नववर्षाचे
देतो तुम्हास हार्दिक शुभेच्छा..!!
************************
सुनिल पवार
[चकोर]

Thursday, 25 December 2014

।। सांता क्लॉज आला ।।

।।सांता क्लॉज आला।।
********************
बर्फाच्या मार्गातून,
हरणाच्या गाडीतून
दूर देशातून
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
शुभ्र धवल दाढ़ीतला
लाल पेहरावातला
गोंडेदार टोपीवाला
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
पाठीवर पोटले घेवून
चेहऱ्यावर हास्य ठेवून
हर्षाचा मेवा घेऊन
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
मुलांच्या स्वप्नातला
मोठ्यांच्या मनातला
जन माणसातला
बुड्ढा man आला
अबाल वृद्धांचा
सांता क्लॉज आला..!!
*******************
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
सुनिल पवार
【चकोर】

Tuesday, 23 December 2014

II आठवणीतला सांता II

II MERRY  'X'MAS II
II आठवणीतला सांता II
*************************
वाटते,
नाताळ दिनी सांता बनावे..
सुखाची पोटली घेऊन फिरावे..!!

दिन दुबळ्यांचे अश्रु फुसावे..
हास्याचे मोती मुक्त उधळावे..!!

जाती धर्माचे बंध तुटावे..
किल्मिष मनाचे गळून जावे..!!

सान थोरांचे आशीर्वाद घ्यावे..
हृदयात सर्वांच्या घर करावे..!!

सरते वर्ष हे यादगार व्हावे..
आठवणीतला सांता बनुन रहावे..!!
**************
सुनिल पवार
[चकोर]

।। इधर भी, उधर भी ।।

।। इधर भी, उधर भी ।।
*******************
गमो के बादल है
इधर भी, उधर भी..
कभी तो होगी बरसात
इधर भी, उधर भी..!!

आंसुओ के सैलाब है
इधर भी, उधर भी..
धूल जाएंगे गम कभी
इधर भी, उधर भी..!!

मायूसी के साये है
इधर भी, उधर भी..
दियेकी लव होगी कभी
इधर भी, उधर भी..!!

मुस्कुराने की चाह है
इधर भी, उधर भी
मिल जायेगी राह कभी
इधर भी, उधर भी..!!
******************
सुनिल पवार
【चकोर】


Friday, 19 December 2014

।। बळी राजा ।।

।। बळी राजा ।।
**************
सरकार म्हणते अच्छे दिन आ गए
पण कोणाचे तेच मला नाही कळले
जगाचा पोशिंदा बळी राजास समस्याने घेरले
आत्महत्येच्या प्रश्नाने राज्यस छळले..!!

संपणार कधी हे आत्महत्येच सत्र
अधिवेशनाचे संपतात सत्रावर सत्र
प्रश्न रोजच ऐरणीवर असतो
उपाय योजना उरतात कागदावर मात्र..!!

सावकारी पाश संपवायाची भाषा होते
वास्तवात मात्र ती वल्गनाच ठरते
मदतीचे पॅकेज मधल्या मधे विरते
सावकारा शिवाय सांगा दूसरे कोण उरते..!!

मिडियाची असते इथे TRP ची लढाई
विरोधक करतात बहिष्काराची घाई
मध्यम वर्गाला कामातुन सवड नाही
बळीराजाच्या अश्रुला का खरच मोल नाही..??

निसर्गाने झोडले सावकारने नाडले
कर्जाच्या उंदाराने पुरते पोखरले
सरकारने मदतीचे तोंडास पान फुसले
मग
आत्महत्येशिवाय सांगा हाती काय उरले..!!
*******
आत्महत्येशिवाय हाती काय उरले..!!
******************************
सुनिल पवार
【चकोर】


।। श्रद्धांजली ।।

।। श्रद्धांजली ।।
**************
कसला रे तुझा धर्म
जो करवितो कुकर्म
कसला तुझा जिहाद
जो करे तुज बरबाद..!!

ओळखेंना माणसाला
काळिमा मानवतेला
फुत्कारशी गरळ नित्य
साप तू जहरीला..!!

तुझ्या क्रुरते पुढे
सैतानही असेल लाजला
नीच तुझी करणी
बालकांचा बळी घेतला..!!

(ना)पाक पुत्र धर्मांध
भस्मासुर जसा उलटला
षंड तुझ्या कृत्याने
मृत्युही इथे ओशाळला..!!
***
मृत्युही इथे ओशाळला..!!
**********************
सुनिल पवार
【चकोर】


।। सामान्य माणूस ।।

।। सामान्य माणूस ।।
*****************
सामान्य माणूस A कॉमन मॅन
भोळा असला तरी मुर्ख नाही
असामान्य सहन शक्तीस अंत नाही
अंत पाहत असेल जर कोणी कधी..??
तर अंत केल्याशिवाय शांत होणार नाही..!!

सामान्य माणूस A कॉमन मॅन
डोळे मिटून परी झोपलेला नाही
उठतो पेटुन सहसा खवळत नाही
खवळला जर चुकून कधी..??
तर समाज ढवळल्या शिवाय राहणार नाही..!!

सामान्य माणूस A कॉमन मॅन
अर्ध पोटी तरी हव्यासी नाही
गरीब असला परी निर्बल नाही
ललकारेल जर कोणी कधी..??
तर नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही..!!
सामान्य माणूस A कॉमन मॅन
दी ग्रेट मॅन..!!
**************
सुनिल पवार
【चकोर】


।। सोनेरी क्षण ।।

।। सोनेरी क्षण ।।
तुलाही आठवत असतील का ग
आपल्या प्रेमाचे ते सोनेरी क्षण..
मला शोधणारी तुझी जादुई नजर
अन तुझ्या भोवती घुटमळणारे माझे मन..!!

तासंतास तुझी वाट पाहत बसायचे
तू मात्र हटकुन उशिराच यायचे..
तू आली नाहीस की मग स्वतःवर रुसायचे
अन तुझ्या अल्लड बहाण्यात मी अलगद फसायचे..!!

चुकून कधी चक्र उलटे फिरले ज़रा जरी
तुझ्या रुसण्यास अन मौनास सीमा नसायची..
मग तुझी मनधरणी करण्यात सखे
दिवस काय सारी रात्रही तोकडीच असायची..!!

तुझा राग लटका असायचा हे मला जाणवायचे
तुझे ते बोलके डोळे हळूच मला खुणवायचे..
आवडायचे मला तुझे लटकेच रुसणे
अन मला फसलेला पाहुन तुझे खळखळुन हसणे..!!

कळलेच नाही ग ऋतुंनी कधी बदलली कुस
अन तुझ्या गुलाबी मनाला कोणी लावली फुस..
निघुन गेलीस तू सारेच घेवून सोनेरी क्षण
मागे उरलय मात्र आता एक खिन्न कोमेजलेल मन..!!
एक खिन्न कोमेजलेल मन..!!
सुनिल पवार
【चकोर】


II धर्म II


II धर्म II
********
ना तू रे कोणाचा इथे..
नाही कोणी तुझा..
नाही शाश्वत देह वेड्या..
चल सोड भाव दूजा..!!
*****
चार दिसाचे सगेसोयरे..
चार दिवसांची नातीगोती..
मग कशास हवी नसती चिंता..
का बाळगावी ती भीती..!!
*****
सोड व्यर्थ हाव माणसा..
कर निष्काम कर्म रे..
सर्व श्रेष्ठ जन्म तुझा..
जप मानवता धर्म रे..!!
जप मानवता धर्म रे..!!
*****
सुनिल पवार
[चकोर]

Tuesday, 9 December 2014

II हवे कशाला II



II हवे कशाला II
वास्तवाशी माझा घरोबा..
स्वप्नांचे इमले हवे कशाला..!!

ह्या मातीशी माझा याराना
आकाश कवेत हवे कशाला..!!

ओंजळीत भरून प्रकाश माझ्या
तिमिराचे भय ते हवे कशाला..!!

नाद ना मजला जुगाराचा
नसीबाचे फासे हवे कशाला..!!

खेळतो मी खेळ सत्याचा
पत्त्याचे डाव ते हवे कशाला..!!

बोलतो मी बोल ते खड़े
शब्दांचे बुडबुडे हवे कशाला..!!

जगने माझे हातात माझ्या
मरणाचे भय ते हवे कशाला..!!
सुनिल पवार
[चकोर]

।। लग्न ।।


।। लग्न ।।
********
३६ गुण जुळले जरी
३६ चा आकड़ा सुटत नाही
सप्तपदीच्या सात फेऱ्यात
भटास दक्षिणा उरत नाही..!!

पोटभर उठल्या पंगती
रित मन भरत नाही
देण्या घेण्यास आता
पैसा काही पुरत नाही..!!

उसने काढले वाण
फेडणे आता होत नाही
झाला रिकामी खीसा
भरता मात्र येत नाही..

होऊन गेले लग्न एकदाचे
निभावणे काही होत नाही
वड्याच तेल वांगयावर
आल्याशिवाय राहत नाही..!!

म्हणून सांगतो..

लग्न मनाचा मेळ असे
भातुकालीचा खेळ नाही
काटकसरीचा मंत्र जपा
अजुन गेली वेळ नाही..!!
********************
सुनिल पवार
[चकोर]

II श्री दत्त गुरु स्तवन II

।। श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
******************************
दिगंबरा दिगंबरा
श्री दत्त गुरु दिगंबरा..
विश्वंभर औदुंबरा
दयाघना हे करुणाकरा..!!
सकल पालनहरा
भक्त वत्सल शुभंकरा..
अनुसूयेच्या पुत्रा
ब्रह्मा, विष्णु, महेश्वरा..!!
नाथांच्या नाथा
गुरुंच्या तू गुरुवरा..
दया मज दीक्षा
अज्ञान माझे दूर करा..!!
अनन्य मी अपराधी
शरण आलो कृपा करा..
नामितो तुज देवा
मायेचे तव छत्र धरा..!!
दिगंबरा दिगंबरा
श्री दत्त गुरु दिगंबरा..!!
***********************
सुनिल पवार
[चकोर]


:::II प्रारब्ध II:::



:::II प्रारब्ध II:::
***************
उपकार केले, अपकार मिळाले..
भलाईच्या नशिबी, मरण आले..!!

ज्यांस सावरले, तेच फिरले..
खेकडेच सारे, दुनयेत भरले..!!

हात मिळवले, कलमच केले..
देण्यास आता, काय उरले..??

सर्वस्व लुटले, रिते न झाले..
प्रारब्ध माझे, ललाटी पुरले..!!
********************************
********************************
सुनिल पवार
[चकोर]

।। कोशिश ।।



।। कोशिश ।।
***************
कोशिश करनेवाले की
कभी हार नहीं होती
हौसले बुलंद देखकर
हार भी है डगमगाती..!!

बढ़ते हुए कदमो को
मुडके ना तू पीछे हटा
मेहनत को दे और हवा
दूर होगी अंधियारी घटा..!!

साथ ना मिले गर किसीका
तो बना हमसफ़र अपना साया
मंझिल बनेगी तेरी राह
रोशन कर हौसलो का दिया..!!

चूमेगी सफलता कदम तेरे
मुट्ठी में होगा सारा आसमाँ
बस इतना याद रख दोस्त
ना करना तू कभी गुमाँ..!!

सुनिल पवार
[चकोर]

Wednesday, 3 December 2014

:::II कागज II:::


:::II कागज II:::
****************
कागज़ के दिल में..
ना जाने कितनी गहराई..
दिल की हर बात..
है कागज़ में समाई..!!

किसी की अच्छाई..
तो किसी की बुराई..
हर एक बात..
है कागज़ ने अपनाई..!!

मरोड़े उसे कोई..
कोई गिराए शाई..
छू सकी ना उसे..
कभी कोई रुसवाई..!!

पढ़ाई और लिखाई..
है कागज़ से आई..
करे सबको सयाना..
है दिल में सच्चाई..!!

पेडो का ये पुत्र..
अब दे रहा दुहाई..
ना काटो अब हमें..
कागज़ बचाओ भाई..!!
(पुन्हा प्रसारित)

*चकोर*
(सुनिल पवार)

Monday, 24 November 2014

।। देवा उघड डोळा ।।

।। देवा उघड डोळा ।।
****************
चिंता साऱ्या माझ्या
देवा तुझ्यावर सोडतो
माझ्या यातनांचा घड़ा
तुझ्या पायाशी फोडतो..!!

वाढले ताट फुढयात जे
मी मुकाट्याने खाल्ले
तू मात्र आपले हात
वरच्या वर झाडले..!!

सहन किती करायचे
हे तुला ही कळू दे
लक्ष तुझे किमान ज़रा
माझ्याकडे वळू दे..!!

सत्वर आता होई जागा
उघड़ तू आपला डोळा
मढयावरच लोणी खाण्या
झालीत बघ भूते गोळा..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Thursday, 20 November 2014

मन

मन..

मन सागर सागर..
कसा लागावा तो थांग।
मनी उठती तरंग
कसे थोपवावे सांग।

मन पाखरू पाखरू
झेप घेई गगनात।
बळ नुरले पंखात
कसे उतरू मनात।

मन आकाश आकाश
लाख चंद्र तारे त्यात।
नाही लागत गं ठाव
कसे भेटू क्षितिजात।

मन मंदिर मंदिर
वसे देव म्हणे त्यात।
फुटे पाझर ना त्यास
किती जोडावे मी हात।
--सुनील पवार..

Monday, 17 November 2014

II बिंदु II

II बिंदु II
********
तुज संबोधू बिंदु..
का म्हणू कृपा सिंधू..
तुज आरंभ म्हणू..
का अंत म्हणू बिंदु..!!

अनर्थ घडे अर्थाचा..
गाळता तुज बिंदु..
शब्द शब्द माळेचा..
अर्थ तूच बिंदु..!!

श्रृष्टित भरुन बिंदु..
नयनात वसे बिंदु..
सूर्य चंद्रात दिसे..
चांदणे तूच बिंदु..!!

जीवन एक बिंदु..
जगतो क्षण तो बिंदु..
वंदितो तुज आधी..
पूर्णत्व तूच बिंदु..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Wednesday, 12 November 2014

II माणूस II



II माणूस II
कोणी म्हणतोय प्रगती..
कोणी म्हणे अधोगती..
जीवनाच्या रहाट गाड्यात..
माणूस देतो स्वतःस गती..!!

दिवासाची काय बात हो..
आता जागून काढतो राती..
स्वःहित जपता जपता..
नष्ट करतो इतर जाती..!!

भरता तुंबडी स्वतःची..
अवनीस करतोय रिती..
झुकवून डोंगर माथे..
उपसली सारी माती..!!

करून नष्ट वनराई..
उभारल्या सिमेंटच्या भिंती..
माणसा तुझ्या हौसेचे..
मोल तरी किती..!!

झाले परागंदा वन्य प्राणी..
लुप्त झाल्या किती जाती..
माणूस नावाच्या श्वापादास..
ना उरली आता कसलीच भीती..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Tuesday, 4 November 2014

।। वृत्ती ।।

। वृत्ती ।।
खेकड्याची वृत्ती आम्ही नाही कधीच सोडणार
वरती चढ़णाऱ्याचे आम्ही पाय अलगद खेचणार..!!

स्वाभिमानी अस्त्र आम्ही आपसात उगारणार
लाचारिची निष्ठा मात्र दिल्लिश्वरी वाहणार..!!

स्वःस्वार्थातच आम्ही नित्य परमार्थ साधणारर
माराठी आहोत आम्ही आम्हास स्वजन बाधणार..!!

अटकेपार झेंडा देशात मराठीचाच फडकणार
दुहिचा शाप इथे आम्हास दुर्दैवाने बाधणार..!!

विचार आहे साधा पण कोण समजून घेणार
आम्हास समजावणारा कोणी पैदा नाही होणार..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। संभ्रम ।।



।। संभ्रम ।।
संभ्रमाचे कोड़े मज..
अजुन नाही उलघडले..
मन होते वेडे बावरे..
इतकेच मज समजले..!!

दिवस रात्र स्वप्नाळू..
भास छळू लागले ..
पाऊल त्या वाटेवर..
हमखास वळु लागले..!!

नसता ती समोर..
मन उगाच हुरहुरले..
विचारात तिच्याच मग..
पुन्हा पुन्हा गुरफटले..!!

मित्रांच्या संगतीतही..
मन एकटे वावरले..
पाहता तीज समोर..
का उगाच बावरले..!!

कळेना माझे मलाच..
हे काय असे झाले..
मन सांगे मनास..
मज प्रेम झाले..!!
मज प्रेम झाले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Monday, 27 October 2014

।। विषमता ।।

।। विषमता ।।
==========
तुमची असते दिवाळी
आमच मात्र दिवाळं
तुमची रात्र उजळ
आमच नशीब काळं..!!

तुमच्या ताटात फराळ..
आमच्या पोटात जाळ
तुमच्या दारात तोरण
आमची दारिद्रयाची माळ..!!

तुमच्या चैनीची वेळ
आमच स्वप्न काजळ
तुमचा पैश्याचा पुर
आमच्या नयनी ओहळ..!!

सारी देवाचीच बाळं
मग अशी का अबाळ
एक ऐश्वर्यात लोळे
दूसरा दारिद्रयाशी खेळे ..!!
*****सुनिल पवार....

Wednesday, 22 October 2014

II शुभ दिपावली II



II शुभ दिपावली II

लक्ष दिप उजळीत आली दिवाळी..
चंद्र तारे सजले पृथ्वीच्या भाळी..!!

उजळली निशा आली सोन झळाळी..
धनत्रयोदशी दिवशी नांदी दिली..!!

अभ्यंग स्नाने शुभ सुरवात झाली..
कंदील, तोरण, दारी रांगोळी सजली..!!

फराळाची गोड रेलचेल झाली..
बच्चे कंपनी फटाक्यात रमली..!!

लक्ष्मी पूजन दिनी लक्ष्मी आली..
आरोग्य,धनसंपदा घरा नांदली..!!

भाऊ बहिणीच्या प्रेमात न्हाली..
भाऊ बीज दिनी ओवाळणी दिली..!!

दिवाळी नंतर येते देव दिवाळी..
तुलसी विवाहाने सरते दिवाळी..!!

चैतन्याचा उत्सव असे दिपावली..
शुभेच्छा सर्वांस शुभ दिपावली..!!

*चकोर*
(सुनिल पवार)

II दिपावलीच्या फराळी शुभेच्छा II


II दिपावलीच्या फराळी शुभेच्छा II
**********************************
एक करंजी..आनंदाने भरलेली..

एक शंकरपाळी..चौकस विचाराची..

एक चकली..कीर्ती विस्तारणारी..

एक लाडू..ऐक्याने एकवटलेला..

एक मिठाई..मनात गोडवा भरलेली..

एक दिवा..मांगल्य भरालेला..

एक रांगोळी..जीवनात रंग भरणारी..

एक कंदील..यशाची भरारी घेणारा..

एक उटणे..जीवन सुगंधित करणारे..

एक कारेटे...समतोल राखणारे..

अन एक मी...शुभेच्छा देणारा..

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
*चकोर*
(सुनिल पवार)

Friday, 17 October 2014

II तुझी आठवण येते II



II तुझी आठवण येते II

तू नाही आली
तुझी आठवण येते
गत क्षणाची ओळख
नित्य नव्याने होते..!!

मरगळले मन माझे
पुन्हा आठवणीत रमते
ओल्या त्या क्षणाला..
मन आपसूक बिलगते..!!

विरहाच्या क्षणावर
नवे मोरपीस फिरते
स्वप्नांच्या नगरीत
मन अलवार शिरते..!!

विसरली तू सारेच
मला अजूनही आठवते
तू नाही आली
तुझी आठवण येते..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Monday, 13 October 2014

।। क्षणाचा ठेवा ।।


क्षणाचा ठेवा..

कधी वाटतो हवा हवा
कधी भासतो नवा नवा
भेटतेस तू जेव्हा जेव्हा
थबकतो क्षण तेव्हा तेव्हा..!!

त्या क्षणाचा ओळखून कावा
ह्रदय करते हृदयावर दावा
वाटतो माझा मलाच हेवा
मिठीत येशी तू जेव्हा जेव्हा..!!

नसतेस तू ज्या क्षणाला
आठवणीत त्या रमतो तेव्हा
बंद पापण्यांच्या कडातुन
ओघळतो त्या क्षणाचा ठेवा..!!
ओघळतो त्या क्षणाचा ठेवा..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। आशा ।।

।। आशा ।।

टक्क्यांच्या आकडेवारीत घुसमटला विकास..
नेते झालेत गब्बर अन देश माझा भकास..!!

प्रत्येक कामा मागे इथे आडवी येते लाच..
गरीबी टाकते मान अन पैसा करतो नाच..!!

शेत मालास भाव नाही हवालदिल शेतकरी..
अड़त्यांनी नागवल अन आसूड ओढ़े सावकारी..!!

नित्य इथे घडतात अबलांवर बलात्कार..
सुरक्षेच आंधळ दळण दळतय आपले सरकार..!!

समूळ नष्ट करा आता बेमुर्र्वत टक्क्याची भाषा..
मत पेटीतुन प्रकटू दे नव्या भविष्याची आशा..!!

*चकोर*
(सुनिल पवार)

Friday, 10 October 2014

II हिरवळ II


II हिरवळ II
निव्वळ म्हटल्याने कधी..
कोण कोणाला विसरले आहे..
आठवणीच्या शेवाळावर..
पाऊल पुन्हा पुन्हा घसरले आहे..!!

सहज शब्द फेकले तू..
बड्या मुश्किलीने झेलले आहे..
तुझ्या प्रिय शब्दांनी..
मज नित्य नव्याने छळले आहे..!!

सरले कैक पावसाळे
मन अजूनही हिरवळले आहे
कोरड्या तुझ्या भावानांसाठी..
हृदय पुन्हा पुन्हा पाझरले आहे..!!
हृदय पुन्हा पुन्हा पाझरले आहे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

II कलेच्या कलेने II



II कलेच्या कलेने II
वाटले कलेकलेने घ्यावे..
कलेचे गुण गावे..
गुण गाता गाता..
तिचेच होऊन जावे..
तिचेच होऊन जावे...!!

वाटले चित्रकलेस घ्यावे..
डोळे भरून पहावे..
पाहता पाहता मग..
तिज आपलेसे करावे..
तिज आपलेसे करावे..!!

वाटले शिल्प कलेस घ्यावे..
मनाजोगते घडवावे..
घडवता घडवता मग..
तिज आपल्यात मिसळावे..
तिज आपल्यात मिसळावे..!!

वाटले हस्त कलेस घ्यावे..
हस्ताने झुलवावे..
झुलवता झुलवता मग..
तिज हळूच फुलवावे..
तिज हळूच फुलवावे..!!

पण...
नियतीस ते मान्य नसावे..
चित्राने विचित्र म्हणावे..
शिल्पाने बेढब वदावे..
हस्ताने कठोर व्हावे..
हिरमुसल्या मना सांग कोठे जावे..!!..
सांग कोठे जावे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Tuesday, 7 October 2014

।। कोजागिरी पोर्णिमा ।।

।। कोजागिरी पोर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तोच चंद्रमा नभात
तोच माझ्या मनात
कोजागिरी राती
तोच खेळे अंगणात..!!
ताऱ्यांच्या मांदियाळीत
चंद्र एक नभात
तोच भरुन राहे
साऱ्यांच्या मनात..!!
जागती जन राती
नाचती तालात
अवघे नभ मंडळ
बघ उतरले दुधात..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Sunday, 28 September 2014

।। उपास-ना एक फार्स ।।

।। उपास-ना एक फार्स ।।
माते तुझा उपवास धरतो..
मला तर तो उपहास भासतो..
कड़क उपवास सागुन सर्वत्र..
फळे वेफर भरपेट खातो..!!

घरात नळाच पाणी चालते..
बाहेर मात्र बिसलेरीच लागते..
शोभेच्या ह्या उपवासाला..
अनवाणी सर्वत्र फिरावे लागते..!!

स्त्री शक्तिची उपासना करतो..
स्त्रीयांना डोळे फाडून पाहतो..
सेटिंग साठीच उशिरा पर्यंत...
डांडियाचा अट्टाहास राहतो..!!

रंग बदलण्याच्या स्पर्धेत..
सरडयाला आम्ही मागे सारतो..
बेगडी बेरंग उपास-ना मग..
बेमालूम एक फार्स ठरतो..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। ध्यास / हव्यास ।।

।। ध्यास /हव्यास ।।
दिवस रात्र..मात्र स्वप्नांचा ध्यास..
ध्यास म्हणु की..म्हणु हव्यास..!!

जगण्याच्या उरावर..नाचे पैशाची रास..
कमावले कोणी..कोणी गमावले श्वास.!!

आधीच उल्हास..त्यात फाल्गुन मास..
हिरवतो कोणी..कोणा मुखाचा घास..!!

जीवन उरले..नुसतेच मृगजळी भास..
विश्वासु वळणावर..दगा फटका हमखास..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Friday, 26 September 2014

II तुझी आठवण II



II तुझी आठवण II

तुझी आठवण..
माझ्या मनाची साठवण..
जपले मी अंतरात..
वेचून ते प्रत्येक क्षण..!!

येता भरून मन..
आठवतो सोनेरी क्षण..
हुरहूर लावे मनास..
अखेरच्या तो शब्द व्रण..!!

नसे कोणी सोबती संगती..
उडून गेले पक्षीगण..
घरटे माझे सूनेच राहिले..
अन सोबतीला मात्र आठवण..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। नऊवारी ।।



।। नऊवारी ।।
नऊवारी तू साडी नेसतेस..
काय सांगू तुला..
तू लय भारी दिसतेस..
शुक्राची चांदणी धरणीवर आली..
अक्षि तू मला तशीच भासतेस..!!

मान वेळावून अशी काय पाहतेस..
काय सांगू तुला..
तू बेभान मला करतेस..
हरिणी वानी चाल चालता..
काळजाच माझ्या ठोका चुकवतेस..!!

मधेच मधाळ हास्य पेरतेस..
काय सांगू तुला..
तू मोती बरसतेस..
ध्यानात,मनात,स्वप्नात तूच..
हृदयावर माझ्या राज्य तू करतेस..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

II सत्तेची साठमारी II


II सत्तेची साठमारी II
बाण भात्यातुन सुटला..
कमळ गाळात रुतला..
जागा वाटपाचा घोड़ा..
चर्चेमध्ये नाहक अडला..!!

स्वबळाची भाषा आता..
जो तो पुन्हा करू लागला..
सत्तेच्या ह्या साठमारीत..
घड्याळ विसरला हाताला..!!

इंजिन विसावलय यार्डात..
ब्लू प्रिंट झंडी दावेना..
विशाल निळ्या ढगाला..
आकाश कुठेच गावेना..!!

बघावं तिकडे मुख्यमंत्री..
इच्छुकांची वाढतेय जंत्री..
हवसे गवसे नवस्यानाही..
विजयाची मात्र वाटतेय खात्री..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Friday, 19 September 2014

।। अश्रु ।।



।। अश्रु ।।
तुझे अस्तित्व केवळ आभास..
मज आता कळते आहे..
मृग जळातील काजळ स्वप्न..
मज आणिक छळते आहे..!!

नाहीस तू माझ्या जीवनात..
मज आता कळते आहे..
वाटेवर तुझ्या अजुनही..
नजर माझी वळते आहे..!!

गेले दिन नाही पुन्हा यायचे..
मज आता कळते आहे..
कांचनमृगा मागे मन माझे..
वेडे अधिक पळते आहे..!!

पाझर नाही फुटणार पत्थरास..
मज आता कळते आहे..
मळभलेले मन माझे तिथे..
अश्रु चार ढाळते आहे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Tuesday, 16 September 2014

II बाजार वेदनेचा II



II बाजार वेदनेचा II
वेदनेच्या बाजारात..
कळीचा भाव आहे..
जखमा खपविण्याचा..
तो नवा डाव आहे..!!

कवितेतेच्या वेष्टनाचा..
योग्य सुजाव आहे..
भावना भेसळीला..
मुबलक वाव आहे..!!

बाजारात मनाचा..
झाला शिरकाव आहे..
वेदनेने घेतला..
मनाचा ठाव आहे..!!

जीवनावर वेदनेचा..
भलताच प्रभाव आहे..
वेदनेच्या बाजारी..
आता..
जगण्यास मज्जाव आहे..!!
चकोर
(सुनिल पवार)

।। पितृ पक्ष ।।




।। पितृ पक्ष ।।
==========
पितृ पक्ष आला..
बाळाला बाप आठवला..
जिवंतप्णी यानेच..
मज वृद्धाश्रमी पाठवला..!!


श्राद्ध घालेल भव्य..
मोजदाद नसेल पक्वान्नाला..
हयातित माझ्या..
मी मोताद होतो अन्नाला..!!

हार घालेल फोटोला..
उत येईल पुजेला..
प्रत्यक्ष मी असताना..
नाही स्पर्शिला कधी पायाला..!!

नको व्यर्थ दिखावा बाळा..
नाही हव्यास मज कसला..
आठवणीत ठेव नित्य मला..
सुख लाभेल मम आत्म्याला..!!
**********सुनिल पवार....

Monday, 8 September 2014

।। भाव मनाचे ।।




।। भाव मनाचे ।।
भाव मनाचे ना जाणिले..
व्यर्थची रुपास भुलले..
सुंदर असते मन खरे..
त्यास कुठे तू पारखले..!!

होते ज़रा वेडे मन..
भावनांनी जसे भरले..
हळवे मन मागे उरले..
मन तुझे असे फिरले..!!

मन असते सुंदर चितवन..
आज तुज कसे स्मरले..
तेज चंद्राचे अवसेत विरले..
जरेने तुज होते घेरले..!!
*चकोर*

II निरोप II


निरोप..

हर्ष उल्हासात रमवून आम्हा
आज बाप्पा घरी चालले..
निरोप तुम्हा देता देवा
नेत्र आमचे भरून आले..!!


ठावूक आहे आम्हास बाप्पा..
सर्व व्यापी आहात तुम्ही..
औपचारिक असते तुमचे जाणे
तरी ही कासाविस होत असतो आम्ही..!!

अंतरातून साद घालतो देवा  
गणपती बाप्पा मोरया..
वाट तुमची पाहतो देवा
पुढच्या वर्षी लवकर या..!!
--सुनील पवार..

Thursday, 4 September 2014

II विश्वाधिपती गणपती II


II विश्वाधिपती गणपती II
तुझ्या कृपेचा हात मस्तकी..
त्राता तू गणपती..
विघ्न विनाशक बुद्धिदायक..
तू विश्वाधिपती..ss
तू विश्वाधिपती..!!

तुझ्याच कवनी रमलो आता..
अल्प माझी मती..
रिद्धि सिद्धिचा तू अधिनायक..
द्या मजला सन्मति..ss
द्या मजला सन्मति..!!

आतुरले हे नयनही माझे..
वाट तुझी पाहती..
गणाधिपती तू अष्टविनायक..
दर्शन द्या साक्षाती..ss
दर्शन द्या साक्षाती..!!

अपराध माझे कोट्यान कोटी..
घ्या तुम्ही उदराती..
भक्तवत्सला तू सुखदायक..
झाली मज उपरती..ss
झाली मज उपरती..!!

शरण मी आलो देवा तुजला..
चरणाची मज प्रीती..
वक्रतुंड तू सिद्धिविनायक..
करितो तव आरती..ss
करितो तव आरती..!!
*चकोर*

Tuesday, 2 September 2014

।। गौराई ।।



II गौराई II
=======
लेक लाडकी लाडकी..
आली माहेरी गौराई..
साडी चोळी मानवुन..
करू या सरबराई..!!

आई गौराई गणाची
बसे गणाच्या शेजारी..
संगे शिव चंद्रमोळी..
करु पुजेची तयारी..!!
झिम्मा फुगडीच्या संगे..
रात्र उत्साही जागेल..
आगमनाचा सोहळा
माझ्या अंगणी रंगेल..!!
पाहुणचार घेऊन
गणासवे ती जाईल..
माहेराचा दरवळ..
नित्य हृदयी राहील..!!
जशी गौराई पुजता..
तशी पूज्य लेक जाणा..
खुडू नका उदरात..
तिला खेळू द्या अंगणा..!!
***सुनील पवार... 


Friday, 29 August 2014

।। स्वागत तुमचे गणपती देवा ।।

बालकाव्य
|| स्वागत तुमचे गणपती देवा ||
===================
स्वागत तुमचे गणपती देवा
घ्या बाप्पा घडीभर पाटावर विसावा।
मखमली कोचवर आरामात बसा
प्रवास करून आला असेल थकवा।

वर्षाने तुम्ही आम्हाकडे आलात
सांगा! स्वर्गाची काय खबरबात?
मोदक तुम्हा बहु आवडतात
मग दुकाने त्याची आहेत का स्वर्गात?

पूजा करिता आशीर्वाद देता
मनोरथ आमचे पूर्ण करता।
सर्वच तुम्ही आम्हा देऊन जाता
मग आईला उत्तर काय हो देता?

तुम्ही येता अन् चैतन्य फुलवता
हर्ष उल्हासात आम्हा रमवता।
दुखः सकलांचे तुम्हीच हरता
जादू ही तुम्ही कशी काय करता?

अखंड आम्हा लळा लावता
अकरा दिवसानी निरोप घेता।
आई म्हणते तुम्ही आकाश मार्गे येता
मग पाण्याच्या मार्गे कसे काय जाता?
--सुनिल पवार..✍️

।। बाप्पा ।।

||__/!\__ बाप्पा__/!\__ ||
================
मन प्रसन्न होते रे माझे
बाप्पा तुला घरी पाहुन
दुखः आमच्या पाचविला जरी
तरी जातो आनंदात नाहुन..!!


उंदीर मामा रोजच फिरतो
रात्री बेरात्री संचार करतो
तू मात्र वर्षातून एकदा येतो
म्हणूनच उर भरून येतो..!!

उकडीचे मोदक नाही जरी
गव्हाचे ज़रा पाहा चाखुन
संपलय रेशन कळेलच तुला
ठेवलय नाही काहीच राखून..!!

सोसत नाही विजेचा भार
म्हणून भागव तू त्या सूर्यावर
चंद्राचा उजेड कमीच भासेल
हसु नको हां माझ्या औंदर्यावर..!!

पाहुन घे माझा राजमहल
पुढच्या वर्षी असेल नसेल
माझ्या मनात मात्र बाप्पा
तुझं स्थान अढळ असेल..!!
******सुनिल पवार.....

Thursday, 28 August 2014

।। निरोप बाप्पाचा ।।



================
।। निरोप बाप्पाचा ।।
================
बाप्पाचा काल निरोप आला
येतोय घरी तयारीला लागा..
पर्यावरणाचा जो बांधील धागा
मिळवील तोच मनात जागा...!!


सुस्वर भजनाची बारी लावा..
कर्कश डीजेचा आलाय कंटाळा.
सुंदर फुलांची आरास करा
थर्माकॉल वापरास घाला आळा..!!
प्लास्टरचा वापर मुळीच नको
शाडूच्या मूर्तीची कास धरा..
वारेमाप विजेची उधळपट्टी नको..
निरांजन समईचा दीपक बरा..!!

नदी सागर जलाचे प्रदुषण टाळा..
जलचर जीवांचे प्राण वाचवा..
कृत्रिम तलावाकडे पाऊले वळवा..
निर्माल्य योग्य जागीच साचवा..!!

भक्तभोळा देव भक्तीचा भुकेला..
नसावा पोकळ दिखावा चढ़ावा..
सुसंस्कृत संस्कारी सण असावा..
तैसाच संग मजला घडावा..!!
********सुनिल पवार......

Wednesday, 27 August 2014

II स्वागत बाप्पाचे II

II स्वागत बाप्पाचे II
********************
दिवस राहिले कमी..
बाप्पा येतील घरी..
स्वागताची त्यांच्या..
करा जंगी तयारी..!!
उंदीर मामा सवे..
येईल बाप्पांची स्वारी..
सुबक मखरात बसवु..
खुश होतील भारी..!!
पूजा आरती करू..
खेळू मंगला गौरी..
प्रसाद रूपी देऊ..
छान मोदक केसरी..!!
छोट्यांनो मोठयांनो..
करा जोमाने तयारी..
स्वर्ग मार्गे येईल..
पहा बाप्पांची स्वारी..!!
*चकोर*

Thursday, 21 August 2014

।। शब्द सांडले ।।


।। शब्द सांडले ।।
============
दिसले तसे मांडले..
न समजावे भांडले..
येता जाता सहज..
शब्द आम्ही सांडले..!!

मनाच्या कागदावर..
रचले स्वप्नांचे इमले
कधी कस्पट ढासळले
कधी सहज जमले..!!

सर्व शब्द समाधान..
हाच आमचा प्रयास..
लावू नका कोणी..
व्यर्थ हो कयास..!!

खुशाल चेंडू आम्ही..
मन मोकळे दरवळतो..
शब्दांच्या ओढीने मग
शब्द शब्द गहिवरतो..!!
*चकोर*

Wednesday, 20 August 2014

।। घडत गेलो मी।।

।। घडत गेलो मी।।
घडत गेलो मी..
बिघडत गेलो मी..
बंद मनाचे कवाड..
उघडत गेलो मी..!!
जोडत गेलो मी..
तोडत गेलो मी..
दुराभिमानी मत..
खोडत गेलो मी..!!
उडत गेलो मी..
पडत गेलो मी..
दुखाःतुन सुख..
खुडत गेलो मी..!!
हसत गेलो मी..
रडत गेलो मी..
संस्कारी मोत्यात..
जडत गेलो मी..!!
*चकोर*

Tuesday, 19 August 2014

।। क्षण ।।



।। क्षण ।।
**************
येतो क्षण जातो क्षण..
आपला कुठे राहतो क्षण..
तरीही का मग वेडा जीव..
तळमळतो इथे प्रत्येक क्षण..!!

क्षणात मजेत हसवतो क्षण..
क्षणात सजेत रडवतो क्षण..
क्षणा क्षणाच्या क्षणिक खेळात..
क्षणात गुपचुप हरवतो क्षण..!!

आज तुझा तर उद्या माझा..
वारा जैसा वाहतो क्षण..
एकनिष्ट ना कधी राहिला..
ऋतू जैसा बदलतो क्षण..!!

क्षणाचा नाही भरवसा इथे..
तरी नाही भरत हे मन..
क्षणा क्षणाच्या मोहापाई..
वाया जाती कित्येक क्षण..!!
*चकोर*

II गोविंदा आला II


II गोविंदा आला II

गोविंदा आला रे आला..
तो कॉर्पोरेट लुक वाला..
पक्ष नेत्यांनी पुरस्कृत केला..
रंग राजकीय आहे चढलेला..!!

गोविंदा आला रे आला..
उंच थरांच्या ह्या थराराचा..
लाख रुपयांच्या आमिषाचा..
जातोय बळी बघा जीवनाचा..!!

गोविंदा आला रे आला..
रंग चढला रे चढ़ाओढीला..
उत आलाय फोडा फोडिला..
मूळ उद्देश गेला मोडीला..!!

गोविंदा आला रे आला..
कशा राहतील मागे बाला..
समरसून त्याही उतरल्या..
टक्कर देती त्या गोविंदाला..!!

गोविंदा आला रे आला..
ट्रक भरून गोविंदा निघाला..
बोल बजरंग बली की जय..
आसमंती नारा घुमू लागला..!!

गोविंदा आला रे आला..
कोणी निसटून थरावरून पडला..
कोणी जायबंदी, जीवास मुकला..
विचारी ना कोणी आता त्याला..!!

गोविंदा आला रे आला..
दिस सरला सण संपला..
पक्षांनी गाशा गुंडाळला..
गोविंदा विस्मृतीत गेला..!!

हाय रे गोविंदा....

पुरस्कार सारे हरवले..
आश्वासन हवेत विरले..
नेते आता दिसेनासे झाले..
गोविंदाचे हाल कुणी न पुसले..!!
गोविंदाचे हाल कुणी न पुसले..!!

*चकोर*