Showing posts with label प्रासंगिक. Show all posts
Showing posts with label प्रासंगिक. Show all posts

Wednesday, 25 August 2021

मर्म रक्षाबंधनाचे

 || रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

=====================

स्नेहाच्या कोंदनाला

रक्षणाचे कवच असते..


धागे कच्चे जरी

नाते हे अतूट असते..


रक्षा बंधनाचे खरे

हेच मर्म असते..


दूर गेलेलं बालपण

पुन्हा घेऊन येते..!!

--सुनिल पवार...✍🏼

Tuesday, 1 September 2020

निरोप तुमचा घेतो

 निरोप तुमचा घेतो..

निघालोय मी
आता निरोप तुमचा घेतो।
पुढच्या वर्षी नक्की येईन
असे वचन तुम्हास देतो।
यंदा डीजेचा गदारोळ नव्हता म्हणून
उंदीर मामाही निःचिंत दिसले।
सुपाएवढे कान माझे
भजन,आरतीनेच संतोष पावले।
हिडीस नृत्याला आळा बसला
उंचीची स्पर्धा कुठे दिसली नाही।
इवले नेत्रही सुखावले माझे
ते मिटण्याची पाळी आली नाही।
डिजिटल का होईना पण
तुम्ही मनोभावे माझे दर्शन घेतले।
बाजारू स्वरूप कुठेच नव्हते
ह्या गोष्टीचे अधिक कौतुक वाटले।
तसे ठाऊक आहे मला
हे सर्व भीतीपोटी निपजलंय।
संकट आलंय वाडी वस्त्यांवर
म्हणून स्वतःस घरी कोंडून घेतलंय।
पण विश्वास बाळगा मनात
आलं संकट दूर होणार आहे।
स्वच्छतेची कास, पर्यावरण रक्षण
हेच तुम्हास तारक ठरणार आहे।
मनी आशा बाळगतो की,
हाच भक्तिभाव पुढच्या वर्षी दिसेल।
तुमच्या सुदृढ मनाचा मोरया नाद
माझ्या हृदयास येऊन भिडेल।
|| बोला गणपती बाप्पा मोरया||
--सुनील पवार..✍️

Monday, 24 August 2020

राखी

 || राखी ||

======

नात्याच्या घावाने 

हृदय छिन्नविच्छिन्न झालेले 

जागोजागी शब्दांचे ओरखडे 

हातावर झेललेले

त्यात माझे हातही फाटलेले

असं असताना

तुझ्या एका दिवसाच्या 

व्यवहारी राखीच्या मलमाने

हे ओरखडे कितपत बरे होतील?

याबद्दल मन सांशक आहे..!!


कदाचित होतीलही बरे

पण ती ओढ कुठून आणणार?

मला माहीतही नाही

तू येणार की नाही येणार?

आलीस तर बरेच आहे

अन्यथा

हे जखमेचे हात 

अश्वत्थाम्या प्रमाणे विव्हळत

तेलवाटीची प्रतीक्षा करणार?


असो..

पण चिंता करू नको

आताशी जखमेची सवय झालीय

पण तरीही इतकं लक्षात ठेव

की तुझ्या सुखाच्या बातमीचा

वाराही पुरेसा आहे

काही क्षण शीतलता देण्यास

आणि

राखीच्या सणाचा सुगंध

निरंतर दरवळत राहण्यास..!!

***सुनिल पवार...✍🏼

Sunday, 23 August 2020

कोई आता नहीं

 कोई आता नहीं..


खाली पड़े है सोफ़े 

कोई घर आता नहीं।

दूरियां बढ़ाने वाला

ये दौर क्यों जाता नही।


राह तकती आँखे

घर सुना पड़ा है।

मन की गलियारों में

ये कौन रोड़ा बना हैं।


दिन खुशियों के है

पर ख़ुशियां नदारत है।

ज़ाहिर करू तो कैसे

क़ैद में इबादत है।


दिया जला है उम्मीद का

दिल में अब भी चाहत है।

तुम घर पर आए बाप्पा

बस मन को इतनी राहत है।

--सुनील पवार..✍️


#kavita #poetry #love #hindi #shayari #hindipoetry #poem #hindikavita #marathi #writersofinstagram #hindiquotes #shayri #urdupoetry #writer #kavi #poems #shayar #quotes #lovequotes #hindishayari #poet #maharashtra #gulzar #marathikavita #instagram #poetrycommunity #hindipoem #india #rekhta #bhfyp

Thursday, 20 August 2020

भेट स्वीकार चॉकलेटची

 भेट..


अगदी सहज विरघळणारी

चव जिभेवर रेंगाळणारी..

भेट स्वीकार चॉकलेटची

वाढवेल प्रेमाची खुमारी..!!


🍫Happy chocolate day 🍫

--सुनील पवार..✍️

म्हणूनच..

 म्हणूनच..


खरं तर मला म्हणायचं नाही

बी माय व्हॅलेंटाईन

कारण तू तर माझ्या हृदयात वसते

आणि तसंही

एका दिवसाची प्रेमाला गरज नसते..!!


पण इतकं कारण पुरेसं नाही

केवळ हृदयात असूनही चालत नाही..

आणि तहान पाण्याशिवाय भागात नाही 

म्हणूनच मी माझं प्रेम व्यक्त करतोय

कारण जगाची तमा मी बाळगत नाही..!!


हॅप्पी व्हॅलेंटाईन डे...💞

--सुनील पवार..✍️

Friday, 14 August 2020

मोरपंख..

 मोरपंख..

मोरपंख डोईवर,
ओठात बासरी..
रूप तुझे सावळे
हे कृष्णमुरार..!!

गोपाळांसवे खेळे,
गोपिकांना छेडे..
पण जगास दिले
अद्वैत प्रेमाचे धडे..!!

गोकुळास तारले
असुरांचे करून मर्दन..
यशोदेचा कान्हा
तू देवकीचा नंदन..!!

गीता सांगून अर्जुनास
तू केले प्रेरित जगास..
घडवून महाभारत
केला अधर्माचा ना..!!

लीला तुझी पाहून
तुज म्हणती लीलाधर..
तव मुखकमल पाहता
जुळती माझे कर..!!
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'मोरपंख डोईवर, ओठात बासरी| सावळे रूप तुझे तू कृष्णमुरारी| गोपाळांसवे खेळे गोपिकांना छेडे| तू जगास दिले अद्देत प्रेमाचे धडे| मो र पं गोकुळास तारले करून असूर मर्दन| यशोदेचा कान्हा तू देवकीचा नंदन। ख गीता सांगून अर्जुनास केले प्रेरित त्यास। घडवून महाभारत केला अधर्माचा नाश| तुझी लीला पाहून तुज म्हणती लीलाधर| तव मुखकमल पाहता जुळती माझे कर| Sp..'
161
People Reached
6
Engagements
3

Thursday, 6 August 2020

प्रिय दादा/ताई

||रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा||

प्रिय दादा/ताई
नको बाहेर पडण्याची घाई।
संकटाची वेळ आहे
करू दुरूनच दिलजमाई।
प्रेमाचा धागा अतूट खरा
राखीचा सण व्हर्चुअल करा।
नेटवर्किंगच्या पुलावरून
प्रतिकात्मक भेटीने साजरा करा।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says '।|रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।। प्रिय दादा ताई नको बाहेर पडण्याची घाई| संकटाची वेळ आहे करू दुरूनच दिलजमाई| प्रेमाचा धागा अतूट खरा राखीचा सण व्हर्चुअल करा| नेटवर्किंगच्या पुलावरून प्रतिकात्मक भेटीने साजरा करा| Your uote.in काव्यचकोर...'
281
People Reached
16
Engagements
9
1 Share
Like
Comment
Share

हे बंध रेशमाचे..

हे बंध रेशमाचे..

नात्याची वीण
सुटता सुटत नाही।
हे बंध रेशमाचे
तुटता तुटत नाही।
दूधच असते जणू
मायेच्या घट्ट साईचे
तापमान कोणतेही असो
फाटता फाटत नाही।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'बंध हा प्रेमाचा नात्याची वीण सुटता सुटत नाही| हे बंध रेशमाचे तुटता तुटत नाही| दूधच असते जणू मायेच्या घट्ट साईचे तापमान कोणतेही असो फाटता फाटत नाही काव्यचकोर... चका Your uote.in'
186
People Reached
8
Engagements
5

Saturday, 25 July 2020

पर्यावरण-वादी

पर्यावरण-वादी..

किती वाचले पाढे
मोकळे झाले मन..
किती बांधले दोरे
जखडून गेले मन..!!
किती वड सावित्री
दावणीला बांधलेले..
किती सत्यवान ते
मोकाट सुटलेले..!!
किती पर्यावरणवादी
अंतरी कळवळलेले..
किती मांडले शब्द
कागद सारे भरलेले..!!
किती परोपकारी मन
दोष दुसऱ्याला देणारे..
किती स्वार्थी तेच मन
मनाचे संदर्भ लावणारे..!!
--सुनील पवार..✍️
4,827
People Reached
135
Engagements
14
6 Comments
90 Shares
Like
Comment
Share