मोरपंख..
मोरपंख डोईवर,
ओठात बासरी..
रूप तुझे सावळे
हे कृष्णमुरार..!!
गोपाळांसवे खेळे,
गोपिकांना छेडे..
पण जगास दिले
अद्वैत प्रेमाचे धडे..!!
गोकुळास तारले
असुरांचे करून मर्दन..
यशोदेचा कान्हा
तू देवकीचा नंदन..!!
गीता सांगून अर्जुनास
तू केले प्रेरित जगास..
घडवून महाभारत
केला अधर्माचा ना..!!
लीला तुझी पाहून
तुज म्हणती लीलाधर..
तव मुखकमल पाहता
जुळती माझे कर..!!
--सुनील पवार..

161
People Reached
6
Engagements
No comments:
Post a Comment