Thursday, 20 August 2020

स्वच्छंद पक्षाप्रमाणे..

 स्वच्छंद पक्षाप्रमाणे..


स्वच्छंद पक्षाप्रमाणे

उडावेसे वाटते कधी कधी 

झुगारून बंधने सारी

वाटते घालावी गवसणी

ह्या विस्तीर्ण आकाशाला

अन् पाऊलखुणाही 

न दिसाव्या कोणाला..!!


पण जबाबदारीच्या कात्रीने

स्वतःच छाटलेल्या पंखांनी

जिथे उडी मारणेही अशक्य

तिथे उडावे तरी कुठवर?

म्हणूनच आता 

मी आकाशालाच कुंपण घातलंय 

अन् त्यालाच 

आपले विश्व मानतोय खरोखर..!!

--सुनील पवार..✍️

No comments:

Post a Comment