ऋतू..
ऋतू येतात ऋतू जातात
प्रितीचे अंकुर नित्य नवे फुटतात
कधी बहरतात, कधी कोमेजतात
तरीही
आठवणीची फळे त्यास धरतात..!!
क्षण येतात क्षण जातात
क्षणा क्षणाने आयुष्य बदलतात
कधी हसतात, कधी आसवे गळतात
ते मनात घर करुन राहतात..!!
--सुनील पवार..✍️
No comments:
Post a Comment