म्हणूनच..
खरं तर मला म्हणायचं नाही
बी माय व्हॅलेंटाईन
कारण तू तर माझ्या हृदयात वसते
आणि तसंही
एका दिवसाची प्रेमाला गरज नसते..!!
पण इतकं कारण पुरेसं नाही
केवळ हृदयात असूनही चालत नाही..
आणि तहान पाण्याशिवाय भागात नाही
म्हणूनच मी माझं प्रेम व्यक्त करतोय
कारण जगाची तमा मी बाळगत नाही..!!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे...💞
--सुनील पवार..✍️
No comments:
Post a Comment