Thursday, 20 August 2020

स्वप्नांची पहाट..

 स्वप्नांची पहाट..


पहाटेच्या प्रसन्नतेची

भूल मनाला पडते..

भाळलेल्या शब्दांतुन

नकळत काव्य उतरते..!!


रणरण उन्हाची असते

त्यातही ती मारवा होते..

एक झुळूक मखमली

क्षणात गारवा देते..!!


सांज रमणीय असते

रंग उधळीत ती येते..

कातरवेळही टळून जाते

अन् रंगत डोळ्यात सजते..!!


मग चांदण्या पेरत

नकळत रात्रही अवतरते..

चंद्राच्या गोड मिठीत

स्वप्नांची पहाट होते..!!

--सुनील पवार..✍️

No comments:

Post a Comment