भस्म..
रात्र दबकत आली
अन् जाळून पळून गेली..
उघड्या डोळ्यांनी केवळ
चौकात मेणबत्ती जाळली..!!
वणवा पेटला चहु दिशेला..
आग क्षणार्धात भडकली..
काच तडकली तुकडे झाले
जनता क्षणभर हळहळली..!!
जळणारी जळून गेली
चर्चा राखेची झाली..
नग्नता चेकाळलेली
भस्म फासून साधू झाली..!!
--सुनील पवार..✍️
No comments:
Post a Comment