Monday, 29 June 2015

|| पावसा तुझा ढग कुठे अडला ||

|| पावसा तुझा ढग कुठे अडला ||
××××××××××××××××××××
पावसा तुझा ढग
सांग कुठे रे अडला
लई दिस झाले
अजुन नाय पडला..!!

लई खुश होतो
तू पायधुळ झाड़ली
कारभारणीन पण प्रेमानं
तुझी आणा भाका काढली..!!
मग का रे बाबा तू
मनात अढ़ी धरली
भर पावसाळ्यात अशी
तू बिनघोर दडी मारली..!!
भरवशावर तुझ्याच ना
मी शेतात बियाणं पेरल
तू नाही आलास
डोळ्यात पाणी भरलं..!!
नको होवू असा कठोर
नको लावू जीवास घोर
झाल गेलं सारं विसर
पुन्हा नव्याने बाळसं धर..!!
:
पुन्हा नव्याने बाळसं धर..!!
*****सुनिल पवार.....

:::II एक होती मूर्ती II:::

:::II एक होती मूर्ती II:::
******************
एक होती मूर्ति
माझ्या मनात बसलेली..
नाजुक जशी बाहुली..
छानशी सजलेली..!!


पाहताच तिजला..
खळी माझी खुलली..
नजर निश्चल..
तीजवर खिळली..!!

पाऊले तिचीच मग..
हृदयाकडेच वळली..
हळुवार पावलांनी..
मन मंदिरात बसली..!!

नित्य तिच्या भेटीची..
आस मज लागली..
स्वप्नातले गोड स्पर्श..
भास मज भासली..!!

हुरहूर अशी की..
ओढ मनी दाटली..
नकळत तिजवरी..
प्रीत माझी जडली..!!

एके दिवशी अचानक..
वाट तिने बदलली..
जशी सूर्याची किरणे..
मावळतीला कलली..!!

लांघुनी हृदय सीमा..
ती दूरवर गेली..
भग्न झाले मंदिर
शकले मनाची झाली..!!

वाऱ्यावर कुठून कशी..
खबर एक आली..
मंदिरात दुसऱ्याच आता..
होती ती सजलेली..!!

होती ती सजलेली..!!
*******सुनिल पवार....

|| V4 चक्र ||

|| V4 चक्र ||
×××××××××
ऋतू येतात
ऋतू जातात
प्रितीचे अंकुर
नित्य नवे फुटतात
कधी कोमेजतात
कधी बहरतात
तर कधी
आठवणीची फळे धरतात..!!


क्षण येतात
क्षण जातात
क्षणा क्षणाने
आयुष्य बदलतात
कधी बेचैन करतात
कधी हास्य फुलवतात
तर कधी..
मनात घर करुन राहतात..!!
*******सुनिल पवार......

Friday, 26 June 2015

|| सिलसिला प्यार का ||

सिलसिला प्यार का..

कोई वफ़ा मांगता
कोई खपा होता..
कोई मेल बढ़ाता
कोई खेल खेलता..
सिलसिला प्यार का
यू ही चलता रहता..!!

कही लब्जोंं का सहारा
कही आँखों का इशारा..
कोई नगमे गाता
तो कोई खामोश चाहता..
सिलसिला प्यार का
यू ही चलता रहता..!!

कोई राह तकता
कोई किसीको टालता..
कोई इजहार करता
तो कोई आहे भरता..
सिलसिला प्यार का
यू ही चलता रहता..!!

जपे सब प्यार की माला
मोहे लागे गड़बड़ घोटाला..
मतलब ना कोई जानता
आधे रस्ते से भाग जाता..
सिलसिला प्यार का
यू ही चलता रहता..!!
--सुनिल पवार..



Thursday, 25 June 2015

|| वास्ता ||

|| द्वंद्व ||

|| द्वंद्व ||
××××××
होकार नकाराच्या द्वंद्वात
कोण कसे जिंकणार..
पालथा आहे घड़ा
सांग पाणी कसे भरणार..!!


किती करू आटापिटा
नाही बोलण्या धजनार..
एका हाताने वेडे
सांग टाळी कशी वाजणार..!!

वेडा माझा आशावाद
नित्य मलाच छळणार..
दूर गेली पावले
सांग पुन्हा कधी वळणार..!!

वेड तुझे मजला
कुठवर घेऊन जाणार..
आभासी ह्या जगाचा
सांग अंत कधी होणार..!!
******सुनिल पवार...

|| तुम ||

|| तुम ||
×××××
तारो की इस मैफिल का
रोशनदान चाँद हो तुम..
मिल जाए तो क्या बात
वह हँसी ख्वाब हो तुम..!!
मिट जाए ना कभी दिल से
वह मीठा आलम हो तुम..
जगमगाए जीवन मेरा
वह आबताब हो तुम..!!
--सुनिल पवार..

II नित्याचेच II

II नित्याचेच II
**************
विरहाचे गाणे..
अश्रुंचे तराणे..
दुखाःचे सजणे..
अन..
माझे भिजणे..
नित्याचेच..!!


वाट पाहणे..
तुझे न येणे..
मना समजावणे..
तरी..
ना मानणे..
नित्याचेच..!!

स्वप्न पाहणे..
रात्र जागणे..
कुट्ट अंधारणे..
अन..
स्वप्न भंगणे..
नित्याचेच..!!

खेळ खेळणे..
खेळणे होणे..
तुझे छळणे..
अन..
माझे जळणे..
नित्याचेच..!!
***सुनिल पवार....

II तुम हो II

तुम हो..

तुम हो घटा घनेरी..
जो आंखोसे बरसती..
कहते हो हमें बैरी..
इल्जाम क्यों लगाती..!! 


तुम तो वो हवा हो..
जो सासों को मेहकाती..
कहते हो हमें बैरी..
इल्जाम क्यों लगाती..!!

तुम हो मेरी ज्योती..
जो आँखों में चमकती..
कहते हो हमें बैरी..
इल्जाम क्यों लगाती..!!

तुम तो मेरी जान हो..
जो दिल में मेरे बसती..
कहते हो हमें बैरी..
इल्जाम क्यों लगाती..!!

कैसी है ये उलझन..
वो जानती ना मानती..
कहती है हमें बैरी..
इल्जाम क्यों लगाती..!!
--सुनिल पवार..

Monday, 22 June 2015

II बारिश के मौसम मे II

II बारिश के मौसम मे II
××××××××××××××××
खिलते है कमलके फुल
बारिश के मौसम में..
मिट जाती जमी धुल
बारिश के मौसम मे..
अब तो कमलसी खिल..
बारिश के मौसम में..!!


गिले शिकवे सब भूल
बारिश के मौसम मे..
तनहा तनहा है दिल
बारिश के मौसम में..
बस एक बार तो मिल
बारिश के मौसम मे..!!
*****सुनिल पवार....

Sunday, 21 June 2015

|| योगा-योग ||

|| योगा-योग ||
×××××××××
करू योगाचा प्रसार
संगे पार्टीच्या प्रचार..
एकच तीर कमान
करु सर्वांची शिकार..!!

आमच काय हो भाऊ
आम्ही नेहमीच तयार..
रोजच करतो कसरत
असतो डोक्यावर भार..!!

पिळवटुन निघते अंग
तेव्हाच पोट आमच भरणार
ह्यांच्या परिस वेगळ
सांगा अजुन काय करणार..!!
******सुनिल पवार.....
|| जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

Saturday, 20 June 2015

|| आकांत ||

|| आकांत ||
××××××××
पावसाची संततधार
देवा..
बिघडले का तुझे दार..
उघड्यावर संसार माझा
नाही छपराचा आधार..!!

पेटवु कशी चुल
देवा..
भुकेल माझ मूल..
रडून रडून निजलं
कसं झालय बघ मलुल..!!
क्षणभर रहा निवांत
देवा..
मिटु दे माझी भ्रांत..
शमू दे पिल्लांची भूक
देवा..
ऐक माझा आकांत..!!
****सुनिल पवार.....

Tuesday, 16 June 2015

|| चेहरा ||

|| चेहरा ||
×××××××
कभी कभी कुछ ऐसा होता
एक चेहरा कोही दिल को भाता..
दिल में फिर कुछ कुछ होता
समजाये दिल ना समजता..!!

दिल में जिसके है प्यार पनकता
पलखो पे उसको बिछाये रखता..
उसके सिवा और कही ना दिल लगता
देखने उसे हर पल तरसता..!!

मगर....

एक चेहरा वोह नहीं यारो
जो इंसान को नजरिया लुभाता
एक चेहरा वोह भी है यारो
जो दिल और आत्मा से देखा जाता..!!

*******सुनिल पवार........

Monday, 15 June 2015

|| सोचू तो कैसे सोचू ||

|| सोचू तो कैसे सोचू ||
×××××××××××××××
है अक्ल से ज़रा कम
सवालो में घिरे हम..
अक्सर जवाब के तलाश में
चक्कर घूमते रहे हम..!!

नजरीया अपना हम
बखूबी जानते है..
सबकी नजरो से देखु
अरमान ये पालते है..!!

कोशिश यही होती है
के दिल की गहराई में पहँचु
बड़ी मुश्किल है मगर
सोचू तो कैसे सोचू..!!

*****सुनिल पवार.....

|| शाळा सुरु झाली ||

*बालगीत*
शाळा सुरु झाली...
शाळा सुरु झाली
चला करूया तयारी..
बाबांनी आणलंय
दप्तर लई भारी..!!
रंगबिरंगी कंपास
मस्त खाऊचा बॉक्स..
नव्या गणवेषावर
नवे बूट आणि सॉक्स..!!
नवा कोरा रेनकोट
पावसा तूच आता घाबर..
खुशाल ये बरे
तू घेऊन मोठी सर..!!
आली आली गाडी
आता चललो मी शाळेत..
पहिली घंटा होईल
तेव्हा जायला हवे वेळेत..!!
--सुनिल पवार..✍️

:::|| शेवटचे पान ||:::

:::|| शेवटचे पान ||:::
××××××××××××××
शालेय जीवनात वह्यांच्या विश्वात
आदर्श असते एक शेवटचे पान..
इतर पाने नामधारी ठरतात
शेवटच्या पानाला पहिला मान..!!

रमे जो तो त्याच्या भावविश्वात
कल्पना येतसे भलतीच रंगात
खेळ खेळे कोणी असा ढंगात
रमवे मन कधी फुल्ली गोळ्यात..!!
जागृत होई कधी कोणी कलाकार
चित्रे घेती विचित्र हास्य आकार..
कधी गिरवे कोणी प्रेमाचे नाव
स्वप्ने करू पाहे मनी साकार..!!
कोणाच्या रोषास त्याचाच आधार
सोबतीस त्याच्या लेखणीची धार..
शेवटच्या बाकाचा भक्कम आधार
शेवटचे पान खरे किमयागार..!!
🌺😊🌺😀🌺😊🌺
*********सुनिल पवार....

Thursday, 11 June 2015

।। सुन्या सुन्या मैफिलीत ।।

।। सुन्या सुन्या मैफिलीत ।।

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
रंग नवे भरायचे आहेत..
तुटलेल्या ह्रदय तारा तरीही
सुर ओले सांधायचे आहेत..!!

तुझ्या जगात नाही मी तरीही
गाव तेथे वसवायचे आहे..
बेचिराख झाल्या भावनांचे
घर दगडी बनवायचे आहे..!!
उजाड़ झाल्या जीवनात माझ्या
रोप आठवणीचंं लावायचंं आहे..
निरंतर वाहतेय पाणी नेत्री
शिंपून प्रेम वाढ़वायचंं आहे..!!
--सुनील पवार..

Wednesday, 10 June 2015

।। असा मी आसामी ।।

।। असा मी आसामी ।।
*****************
 डोळस बनून मिरवतो मी
अंधारी चाचपडत फिरतो मी..!!

गोष्टी जगाच्या सांगतो मी..
घरात डबक्याच्या वावरतो मी..!!

आपलेच सकळांस मानतो मी..
दूर खुपणा-यास सारतो मी..!!

जनांस कनवाळू दर्शवितो मी..
चेह-यावर चेहरा धरतो मी..!!

मान दिखाव्याचा देतो मी..
दुराभिमान अंतरी पाझरतो मी..!!

नाहक वादविवाद टाळतो मी..
मानसिक छळवाद आरंभतो मी..!!

न करून सारेच करतो मी..
अंती जगी श्रेष्ठ ठरतो मी..!!
********सुनिल पवार.....

Tuesday, 9 June 2015

II गुरु II

IIगुरुII

गुरु ज्यास नाही
ऐसा जगी कोण आहे।
गुरुवीना जीवन
मातीमोल आहे।

प्रथम गुरु माता
जी प्रेम तुजला देते।
अजाण बालक ते
आई प्रथम वदते।

द्वितीय गुरु पिता
जे धैर्य तुजला देती।
जगी ताठ मानेने
जगण्यास ते शिकवती।

तृतीय गुरु शिक्षक
जे सकल ज्ञान देती।
सुजाण नागरिक
देशाचे ते घडवती।

चतुर्थ गुरु अनुभव
जो समाज तुज देतो।
तुझ्या जीवनाचा मार्ग
त्यातून सुकर होतो।
--सुनिल पवार..✍️
1,112
People Reached
89
Engagements
34
4 Comments
4 Shares
Like
Comment
Share

|| पहिल्या पावसाची सर ||

|| पहिल्या पावसाची सर ||
×××××××××××××××××
पहिल्या पावसाची सर
आली घेऊन नवा बहर
थांब सखे साजणी
तू अजुन एक प्रहर..!!


अमृताची ओंजळ
तू आज रीती कर
थेंब थेंब झेलाया
हे अधीर से अधर..!!
****सुनिल पवार...

II आली आली हो महागाई II

II आली आली हो महागाई II
***********************
आली आली हो महागाई..
हिने कंबरडे मोडले बाई..!!

तोकडा पगार भागत नाही..
झाली भलतीच हो हातघाई..
काय करावं सुचत नाही
मेताकुटीला जीव आला बाई..!!

कांदा रडवतो हाय बाजारी..
जसा अडलाय वर हा दारी..
ह्याची मागणी परवडत नाही..
आता नाकाने सोलवत नाही..!!

भोपळी मिरचीचा रुबाब भारी..
जशी वरमाई मांडव दारी..
हिची मिजास फुकट बाई
बंदया रूपायास किंमत नाही..!!

भोपळा फुगलाय हो लई भारी..
जसा वराचा बाप व्यापारी..
ह्याला कोणी बी विचारीत नाही..
पण किंमत कमीच नाही..!!
आली आली हो महागाई..
हिने कंबरडे मोडले बाई..!!

भेंडी नखरेल मिरवते भारी..
जशी करवली लग्ना घरी..
हिचा मेकअप उतरत नाही..
अन भाव काही घसरत नाही..!!

सणासुधीचे दिस आले दारी..
त्रासलीय जनता जनार्दन सारी..
आमच्या सरकारला जागचं नाही..
मस्त झोपलीय उठवायचं नाही..!!
:
आली आली हो महागाई..
हिने कंबरडे मोडले बाई..!!
*********सुनील पवार.......

II बालमजूर एक मंथन II

II बालमजूर एक मंथन II
******************
 तो एक बाल सुकुमार
कप बशा विसळत होता
उभ्या आयुष्याच्या रवी
जसा मंथनी घुसळत होता..!!


शिव्या घाली मालक
तो निमुटपणे ऐकत होता
जणू असुराचे सहाय्य
जसा देव तो घेत होता..!!

स्वतःच होऊन शिव
तो हलाहल पचवत होता
उज्वल भविष्याच रत्न
मनामधे सजवत होता..!!

पाहत होतो निरखुन त्यास
तो सर्वांपासून दूर होता
जाता जवळ जाणले मी
तो एक बाल मजूर होता..!!

कधी मिळेल अमृत हक्काचे
प्रश्न मनास पडला होता
विषपान करणारा शिव
माझ्यात कुठे दडला होता..??
कित्येक असतील बालमजूर
मी एकच त्यातला पाहिला होता
पाहून त्याच्या वेदना
जिव माझा घुसमटला होता..!!

जग सारे होते बागडत
तो मंथनात गुंतला होता
आयुष्य त्याचे जसे हलाहल
तो स्वतःच त्यात घुसळला होता..!!
:
तो स्वतःच त्यात घुसळला होता..!!
*******सुनिल पवार.......

Friday, 5 June 2015

II हरवले गाव स्वप्नातले II

II हरवले गाव स्वप्नातले II
***************************
एक होते गाव
मी पाहिलेले
घर होते मातीचे
शेणाने लिपलेले..
अंगणी तुलसी वृंदावन
मांगल्य वसलेले
अमृताची बोली अन
माणुसकी जपलेले..!!

उंच डोंगर रांगा
झाडीने नटलेले
पशु पक्षी, गो धन
विपुल बहरलेले..
पाखरांनी किलबिल
दुकान थाटलेले..
स्वयंसिद्ध समाधानी
समृद्धिने डवरलेले..!!

कोंबड्याच्या बांगेवर
जागे झालेले..
भल्या पहाटे
शेतात राबलेले ..
मातीच्या कुशीत
सोन पिकलेले..
संयमी समाधानात
सुख लाभलेले..!!

कसे कुणा दृष्टाच्या
नजरेत भरले..
डोंगर माथे
क्षणात झुकले..
निर्जीव झाल्या नद्या,
जलस्त्रोत आटले.
वणव्यात जसे कुणी
गाव फुंकले..!!

स्वार्थी शहरी वारे
गावात शिरले..
जंगल तोडीचे सर्वत्र
पेव फुटले..
गाव हव्यासी विद्रूप
बकाल झाले..
पैशाच्या नादाने
माणुसकीस लुटले..!!

स्वार्थ मतलबाने
पुरते घेरले..
विष बिज कसे
कुणी पेरले..
स्वप्नातले गाव
माझे हरवले..
आता मात्र
कवन उरले..!!
*******सुनील पवार........

Thursday, 4 June 2015

II सागर किनारी II

II सागर किनारी II
*******************
गोष्ट मी सांगतो प्रेमाची
ना राणीची ना राजाची..
निखळ भावनांनी भरलेली
लाटेची अन किना-याची..!!

हळूच सरकली एक लाट
किनार्यास येवून थडकली..
रुजला अंतरी ओलावा
किना-यास ती बहु आवडली..!!

नकळत जुळले प्रेम नाते
गुंज मनीचे सुरु जाहले..
चंद्राच्या साक्षीने मग
आणा भाका भरु लागले..!!

दिवस होते छान चालले
प्रेम होते आले भरा..
नकळे कोठून आला वारा
उडविला त्याने बोजवारा..!!

फुंकता कान सागराचे 
क्रोधे सागर उंच उसळला..
लाटांस फर्मान सोडता झाला
नेस्तनाबूत करा त्या किनार्याला..!!

जोरदार केला मारा लाटांनी
वारा त्यांच्या सहाय्यास आला..
जर्जर झाला हतबल किनारा
खचला, थोडा मागे हटला..!!

अत्याचार असे बहु झाले
परी प्रेम ना कधी आटले..
निवळला सागर निखळले बंध
प्रेमे आलिंगे पुन्हा भेटले..!!

आठवीत त्यांची प्रेम कहाणी
प्रेमी बसतात आता सागर किनारी..
लाट किनार्यास मानून साक्षी
घेत असतात स्वप्न भरारी..!!
घेत असतात स्वप्न भरारी..!!
*********सुनिल पवार.....

Wednesday, 3 June 2015

II कर्ण II

II कर्ण II
********
कुंती तयाची होती माता
पांडवांचा तो जेष्ट भ्राता..
काय वर्णावी कर्ण गाथा
गाथा म्हणू का म्हणू व्यथा..!!

कवच कुंडले घेऊन आला
शापित परी जीवन जगला..
सूर्य पुत्र असता तेजस्वी
सूत पुत्र जने उपेक्षीला..!!

मनगटावर भरवसा होता
कूट नितीस नव्हता थारा..
दान वीर हो त्या सारखा..
नाही जन्माला कोणी दूसरा..!!

महान करून गेले त्यास
कवच कुंड़लाचे अमर दान..
श्री कृष्णे केले गुणगान..
ऐसा वीर कर्ण महान..!!

मित्रांचा हा मित्र दिलदार..
स्व: कर्तुत्वाने होता घडला..
वर्ण द्वेषाच्या जात्यात मात्र..
कर्ण नाहक होता भरडला..!!
कर्ण नाहक होता भरडला..!!
********सुनिल पवार......


II खेळ ६४ घरांचा II

II खेळ ६४ घरांचा II
**************
 एक असतो राजा,
ना कसली घाई त्याला..
एक एक घर घेत,
चहु ओर फिरला..
येता टप्प्यात शत्रु,
नकळत गारद केला..
पण घाबरतो हां
प्रत्येक प्याद्याला..!!


एक असतो वजीर,
कुठेही हजर..
चाल करून जाई
शत्रूवर भराभर..
वाटेत जो आला
आडवा कर त्याला
संचार ह्याचा चहुओर
सर्वत्र 64 घर..!!

एक असतो ऊंट,
जशी वाकडी भिंत
तिरकी ह्याची चाल,
करे शत्रूस भयभीत..
मार्ग न बदले कधी,
न सोडे रंगसंगत..
राजाच्या दिमतीला,
असते उंटाची पंगत..!!

एक असतो घोड़ा,
असा दुडदुड धावला
अडीज घराच्या चालीत,
चौखूर तो उधळला..
कळेना कधी शत्रूस,
हा नक्की कुठून आला
कळण्या आधीच काही,
त्याचा कार्यभाग संपला..!!

एक असतो हत्ती,
अति विशाल काय
असता तो जवळी,
भीती राजास नाय..
संकटाच्या समयी
नेमका (कैस्लिंग) धावून जाई
येईल जो मार्गात,
त्याची धडगत नाही..!!

एक असतो प्यादा,
सैनिक असे खंदा..
दिसला जरी साधा,
बलाढ्य त्याचा इरादा..
रूप बदलतो बेमालूम
उडवतो शत्रुचा धुव्वा.
64 घरांचा असतो
हाच रूपया बंदा..!!

सुख दुखाःची जशी
असावी ओली भेळ
64 घरांचा असतो
तसाच संघर्ष खेळ..
खडतर जीवन पटावर
देतो जगण्यास नवे बळ..
तुम्हा आम्हा परिचित
नाव त्याचे बुद्धिबळ..!!
*******सुनिल पवार.....

|| मेहमान चंद घडी का ||

|| मेहमान चंद घडी का ||
××××××××××××××××
था जब बचपन
लगते थे सभी अपने
होश संभाला जब
घेर लिया है शक ने..!!


देखने लगा सबको
मतलब की निगाहो से
गिरने लगा अक्सर
अपने ही निगाहो से..!!

भेद भाव करता रहा
ये अपने वो पराये..
लेता कभी दुवाए
कभी किसी की बलाये..!!

निकाला जब जनाजा
तब जाके जाना..
दो घडी का साथ था
पल भर का ठिकाना..!!

ना कोई अपने थे
ना ही कोई पराये थे..
मेहमान हम खुद थे
सब पहुचाने आये थे..!!
****सुनिल पवार....

|| अच्छे दिन आये है ||

|| अच्छे दिन आये है ||
×××××××××××××××
अच्छे दिन आये है भैया
हम विदेश घूम आये है..!!

देखा नहीं देश जितना
उतना विदेश देख आये है
सोचता हु अब भैया
क्या और भी कुछ बचा है...!!

हवाई यात्रा बहोत हुई
अब रॉकेट जहन में आया है
नमो नाम दिलवाया उसको
कमल चिन्ह छपवाया है..!!

अपने देश में क्या रखा है
चूसा हुआ एक गन्ना है..
चाँद मंगल घूम आवू भैया
अब यही दिली तमन्ना है..!!

अच्छे दिन आये है भैया
हम विदेश घूम आये है..!!
****सुनिल पवार...

।। मौन ।।

।। मौन ।।
×××××××
कोणाचे मौन
अन कोणास कळा
मौनात वाहे
कधी दुखः भळभळा..!!


कोणास मौन
कधी लावितसे लळा
कधी कोणा
व्यर्थ देतसे कळा..!!

खेळे कोणी
कधी मौनात शाळा
कधी गहिवर
कधी प्रेम लडीवाळा..!!

कधी फायदे
कधी फिरतो बोळा
बोका लोण्यावर
जसा ठेवतो डोळा..!!

किती बोलतो
कधी येतोय कंटाळा
वाटल तर घ्या
नाहीतर खुशाल टाळा..!!
*****सुनिल पवार....

।। ढोल ।।

।। ढोल ।।
××××××××
व्हाट्स अप वर
ग्रुप उदंड झाले..
नेटचे पॅक संपले
अन
वाद ओघाने आले..!!


विचारू नका कसे काय
ऐका एडमिन म्हणतो काय
हीच खरी मेख आहे
उत्साहाला वाव नाय..!!

कोणी म्हणे चित्र हवे
कोणास वाटे शब्द हवे
मग अभिव्यक्तिच काय?
विचारतो काय भाऊ
ग्रुप सोडायचा हाय..!!

सम्मेलना नंतर आता
ग्रुपही गाजत आहेत
कवी मानाचा ढोल
असाही वाजत आहे..!!
****सुनिल पवार......

।। शोध ।।

।। शोध ।।
×××××××
शोध घेता मी माझा
थांग काहीच लागेना..
कसली मनाची नाती
कोणीच काही बोलना..!!


भेदु पाहे चक्रव्यूह
मार्ग कोणीच दावेना..
गुंतत गेलो अधिक
सुटका काही होईना..!!

दावितसे जगास मी
नित्य नव्याने आईना..
माझ्याच चेहरा मला
का ओळखता येईना..!!
****सुनिल पवार.....

।। प्रेम आणि त्याच्या उपमा ।।

।। प्रेम आणि त्याच्या उपमा ।।
*************************
काय आणि कसे असते प्रेम
मला अजुन उमजले नाही..
विविध उपमेत सजविलेले प्रेम
समजून घेता समाजले नाही..!!


लोक प्रेमाला सागराची उपमा का देतात
उलघडा मला काही होत नाही..
कारण स्वतःचे अस्तित्व मिटवणाऱ्या नदीकडे
लक्ष सागराचे जात नाही..!!

काहीं म्हणतात प्रेम चंद्रा सम असते
जाणून घेता मज त्यातही मेख दिसते
मन त्याचे पृथ्वीत रमते
सागराच्या प्रेमाची त्यासही कदर नसते..!!

काहींच्या मते प्रेम पृथ्वी परी असावे
समजून घेता त्यातही तेढ दिसते..
चंद्राच प्रेम तिच्या लेखी काहीच नसते
तिला मात्र सूर्याच वेड असते..!!

मग प्रेम सूर्या सारखे तरी असेल
पाहिले मी त्याचही काही खरे नसते..
पृथ्वीला जाळणे हेच त्यास कळले
प्रत्येका नाशिबी का असेच छळणे असते..!!

कसल्या त्या उपमा अन कसले ते प्रेम
करावे ज्यावर का नसावा तो नेक..
काय अर्थ काढावा मग मी प्रेमाचा
उदाहरणे ही त्यांचीच अशी दिलफेक..!!
********सुनिल पवार......

||| ना जाने कब ||

ना जाने कब..

ना जाने कब मिलेगा
कश्ती को किनारा..
तनहा जिंदगी को
अब भी है इंतजार तुम्हारा..!!


ना जाने कब मिलेगी
नदिया की धारा..
प्यासे सागर को
अब भी है इंतजार तुम्हारा..!!

ना जाने कब मिलेगी
अंबर को धरा..
बरसे नयन को
अब भी है इंतजार तुम्हारा..!!

ना जाने कब बरसेगी
वह प्यार की धारा..
ना जाने कब
ख़त्म होगा इंतजार हमारा..!!
--सुनिल पवार..

|| शीघ्र कविता ||

|| शीघ्र कविता ||
××××××××××××
शीघ्र कविंची कविता वाचून
मला ही मग मोह झाला
म्हटल काय हरकत आहे
प्रयत्न करुन पाहायला..!!


विषय काय असावा
ह्यावरूनच शब्दांची जुंपली
हां ना करत मग
एक एक ओळ गुंफली..!!

मग भावनेने सुद्धा
बरेच आढेवेढे घेतले
आवरता आवरता तिला
माझ्या नाकी नऊ झाले..!!

बऱ्याच प्रयासाने मग
गंगेत घोड़े न्हाले
सांगा कविता माझी वाचून
तुम्हा कसे वाटले
*****सुनिल पवार......

|| हळदी कुंकु ||

|| हळदी कुंकु ||
××××××××××
जिथे पहावे तिथे
बानुचा बोलबोला
पारावार नाही
म्हाळसाच्या दुखाःला..!!


कैफियत तिने तरी
आता सांगवी कोणाला..
देव मानले ज्याला
त्यानेच घात केला..!!

समाजाचं तर तुम्ही
काही बोलुच नका..
चवीनं चघळतोय
प्रत्येक चौक आणि नाका..!!

कित्येक घरी असणार
असाच एखादा करंडा
हळदी कुंक म्हणत
लोक मिरावतील झेंडा..!!
*****सुनिल पवार......

|| अश्वत्थामा ||

|| अश्वत्थामा ||
************
अश्वत्थाम्याच्या जखमेस
का कोणी पाहिले नाही..
दूध आहे का पाणी
हे त्यानेही जाणले नाही..!!


द्रोण पुत्र तेजस्वी
मुकुट मणीसह जन्माला..
अमरत्व लाभले जरी
तरी का लयास गेला..!!

का घडला तो असा
कोणी कधी विचारले नाही..
शल्य त्याच्या मनाचे
का कोणीच जाणले नाही..!!

पित्यानेही पुत्राकडे
लक्ष कधी पुरवले नाही..
असोनी वीर धनुर्धर
विजयास त्याने वरले नाही..!!

ब्राह्मण पुत्र असूनही
हीन कृत्य करता झाला..
वीर धुरंदर सेनानी
पितृ हत्येने बिथरला..!!

वाहत गेला अधर्म प्रवाही
सुडाग्निने मन पेटवले..
अमरत्वाच्या कवचानेही
मग त्यास ना तारीले..!!

निद्रेत घात करता झाला
युद्ध धर्म विसरला..
ब्रह्मास्त्राचा धनी तो
कुचकामी इथे ठरला..!!

निर्दये कापले पांडव पुत्र
बाळ गर्भातील वेधू पाहिला..
मुकुट मणीस मुकला
भळभळत्या जखेमेचा भार वाहिला..!!

सरता सारासार विचार
कडेलोट अंधारी झाला..
वरदानही मग शाप ठरले
लपवून वदन फिरू लागला..!!

फिरतो अजूनही अंधारी
अश्वत्थामा तो सैरावैरा..
तुम्हास कधी दिसला
सांगा कोणी कुठे पाहिला..!!
******सुनिल पवार....

।। व्हाट्सअप वाणी ।।

।। व्हाट्सअप वाणी ।।
*****************
आपणास ठावे
लोकांस सांगावे
स्टेटस जपावे
व्हाट्सअपचे..!!

इकडून घ्यावे
तिकडून घ्यावे
जनांस वाटावे
सर्व ज्ञान..!!

विनोद सांगावे
चित्रात बोलावे
फितीत रमावे
रात दिन..!!

समूह जोडावे
समूह काढावे
वेडेच करावे
सकलांस..!!
***सुनिल पवार..

II एके दिवशी काय झाले II

II एके दिवशी काय झाले II
********************
 एके दिवशी काय झाले
सखी म्हणाली सख्याला
तुम्हावर प्रेम जडले..
तुम्ही की नाही,
मला लई आवडले
सख्या म्हणाला,
च्यामारी हे असे
कसे काय घडले....??

प्रेम करण्यासारख
माझ्यात काय दिसले.....??

सखी म्हणाली
तुमच्या भोळेपणावर भाळले....
मनात म्हणाली
बावळटा कसे काय गंडवले..
चैन करायला आता
नवे सावज गावले..!!

त्या दिवशी सख्याला
आकाश ठेंगणे झाले..
प्रीतीच्या हिंदोळ्यावर
मन त्याचे झुलले...
आणा भाका घेणे
ओघानेच आले..
रागावणे मनवणे
हे नित्याचेच झाले..!!

मग एके दिवशी
सखीचे मन भरले.
अन सख्याचे
खिसे रिकामी झाले
सखीने सख्याला
वा-यावर सोडले
त्या दिवशी सख्याचे
तीन तेरा वाजले..!!

झुलणारे मन
क्षणात खाली आले
कळेना सख्याला
नक्की काय झाले
म्हणालो मी त्याला
येडा की खुळा
केला की तिने
तुझा चांगला खुळखुळा..!!

तरीच म्हणतोय च्यामारी
इपरीत कसे घडले
उजेडाने काजळाला
कसे काय वरले
कारण त्याचे
आता कुठे कळले
सखीने सख्याला
होते पुरते गंडवले..!!
***सुनिल पवार....

।। प्राक्तन ।।

।। प्राक्तन ।।
************
घर प्रेमाचे छान असे सजले होते..
वासे तयाचे उलटे फिरले होते..!!

क्षण सुवर्ण ओंजळीत भरले होते..
पाणी जसे चाळणीत जिरले होते..!!

तरल धाग्याचे नाते गुंफले होते..
धागे नात्याचे जसे विरले होते..!!

हृदयावर नाव माझ्या कोरले होते..
भाळी कुंकू ते कोणी भरले होते..!!

मन मनास कधी तिने चोरले होते..
गळा तिच्या परक्याचे डोरले होते..!!

प्राक्तनाचे नियम जे ठरले होते..
नियतीने विराहास वरले होते..!!
*********सुनिल पवार......