पर्यावरण-वादी..
किती वाचले पाढे
मोकळे झाले मन..
किती बांधले दोरे
जखडून गेले मन..!!
किती वड सावित्री
दावणीला बांधलेले..
किती सत्यवान ते
मोकाट सुटलेले..!!
किती पर्यावरणवादी
अंतरी कळवळलेले..
किती मांडले शब्द
कागद सारे भरलेले..!!
किती परोपकारी मन
दोष दुसऱ्याला देणारे..
किती स्वार्थी तेच मन
मनाचे संदर्भ लावणारे..!!
--सुनील पवार..

4,827
People Reached
135
Engagements
No comments:
Post a Comment