पण कुठवर..??
परक्यावर प्रेम दाखवणारे
आपल्या माणसाशी अंतर राखतात..
लोक बहिऱ्याजवळ जातात
अन् मुक्याची तक्रार करतात..!!
आंधळ्यासोबत डोळस
आंधळी कोशिंबीर खेळतात..
दूर पळणाऱ्याच्या मागे
एकजात धावत सुटतात..!!
मागणाऱ्यामुळे अस्तित्व ज्याचे
त्याच्याकडेच मागणे मागतात..
गुणवंताचे निर्माल्य करून
लोक चेहऱ्याला पूजत बसतात..!!
पण कुठवर चालणार हे सर्व?
लोक कधीतरी कंटाळून जाणार..
मग आपल्याच हस्ते घडविल्या मूर्तीचे
ते विसर्जन करून घरी परतणार..!!
--सुनील पवार..

969
People Reached
59
Engagements
No comments:
Post a Comment