एकांत..
एकांत नेहमीच खायला येतो
असे नाही
किंवा निराशेच्या गर्तेत ढकलतो
असे ही नाही..
तर कधी कधी,हा एकांत
माणसास नवी ऊर्जाही देतो..!!
तो एकांतच असतो
जो जीवघेण्या एकटेपणाची
जाणीव करून देतो..
आणि तो ही एकांतच असतो
जिथे स्वतःच्या अस्तित्वाचा
शोध आपणास लागतो..!!
--सुनिल पवार...




530
People Reached
15
Engagements
No comments:
Post a Comment