बाप नावाचा दिवा..
बाबा तुम्ही होता म्हणून
घराला खरे घरपण होते।
तुमच्याच छत्र छायेत बाबा
सुरक्षित आमचे बालपण होते।
ऊन आम्हा जाळू शकले नाही
कारण तुम्ही सावली देण्या वृक्ष झाले।
वादळ वाऱ्याचीही भीती नव्हती
कारण तुम्ही पर्वत बनून दक्ष राहिले।
पण तुमच्या अकस्मात जाण्याने
जणू आयुष्य सारे विखुरले गेले।
घरकुल आता सुनेसुने झाले।
अन् डोळ्यात केवळ पाणी उरले।
आता काहीच ओळख नाही माझी
नात्याचे अंगणही रिते झाले।
बाप नावाचा दिवा विझून गेला
अन् केवळ अंधाराचे जिणे उरले।
--सुनील पवार..

956
People Reached
70
Engagements
No comments:
Post a Comment