Saturday, 25 July 2020

II प्राजक्ताचे धन II

II प्राजक्ताचे धन II

इवले इवले फुल
त्यास केशराची झूल।
प्राजक्ताचे फुल पाहता
पडते मनास भूल..!!
निर्मोही श्वेत मन
सुगंधित धुंद तन।
दरवळता चहुओर
प्रफुल्लित होतो क्षण।
सडा अंगणी पडता
होतो नभाचा भास।
अवचित आली धरा
जणू चांदण्यांची रास।
क्षणभंगुरसे जीवन
परी दरवळ जीवनभर।
गंधित प्राजक्ताचे धन
धरा ओंजळीत क्षणभर।
--सुनिल पवार..✍️
50
People Reached
3
Engagements
2

No comments:

Post a Comment