Wednesday, 29 July 2020

आपल्यातील आपण..

आपल्यातील आपण..
मी भेटलो आपल्या माणसांना
मी भेटलो परक्यांना सुद्धा..
परके कधी आपले झालेच नाहीत
हा आहे एक वेगळा मुद्दा..!!
पण आपले सुद्धा परके होतात
मुद्दे सारे तिथेच राहतात..
वेळेच्या कसोटीवर सगळेच
वाहत्यासोबत वाहत जातात..!!
मग आपले कोण अन् परके कोण?
प्रश्न मनास सतावत राहतात..
आपले असे आपणच असतो
ह्या उत्तरावर विसावत जातात..!!
मग कशास इतरस्त्र का शोधतोय मी
उगाच आपले परके करतोय मी..
आधी आपल्यातील आपण शोधले पाहिजे
आता त्याच्याच शोध घेतोय मी..!!
--सुनील पवार..✍️
227
People Reached
8
Engagements

6
2 Comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment