एक दिवा..
एक दिवा
आता पुसतोय कोनाड्याला..
पेटावं की न पेटावं
हा प्रश्न सतावतोय त्याला..!!
कारण
उजेडाशी फारकत घेणाऱ्याला
त्याची आवश्यकता नाही
तसंही दिवटे दिवे लावत नाही
त्यांना काहीच भावत नाही
मग मार्ग दाखवावा तरी कोणाला..?
एक दिवा
आता पुसतोय कोनाड्याला..!!
ते पालिते पाजळून फिरताहेत
काही स्वतःच पेटताहेत
घर जळतंय
पण फिकीर आहे कोणाला
जो तो तयार दिसतोय
आपलीच पोळी शेकायला..
एक दिवा
आता पुसतोय कोनाड्याला..!!
--सुनील पवार..

5,590
People Reached
224
Engagements
No comments:
Post a Comment