मी शोधतोय तिला..

काल काळी कलुटी होती
आज रंगात नाहली।
अप्सरा की रंभा जशी
ब्युटीपार्लर मधून आली।
काल जाडी बेढब होती
आज एकदम स्लिम झाली।
काल टाळत होतो तिला
आज मात्र ड्रीम झाली।
काल मावत नव्हती
अन् आज गावत नाही।
पण तिच्या सोबतीने
मिरवल्याशिवाय राहवत नाही।
मी शोधतोय तिला
पण ती सापडत नाही।
उगाच तर्क लावू नका
प्रेमाची ही भानगड नाही।
तसं अडणार नाही म्हणा
पण खात्री देता येत नाही।
पावसाचा काही भरवसा नाही
आणि छत्री कुठे दिसत नाही।
--सुनील पवार..



471
People Reached
29
Engagements
No comments:
Post a Comment