असा पडावा पाऊस कधीतरी..
असा पडावा पाऊस कधीतरी
की आकाश धरेचं मिलन व्हावं।
मातीच्या सुगंधात धुंद होऊन जावं
अन् अंतर्बाह्य चिंब भिजून घ्यावं।
असा पडावा पाऊस कधीतरी
की धरणीच्या हृदयात प्रेम रुजावं।
भरलेल्या मेघांनी रीतं होऊन जावं
अन् नदीने सागरात विलीन व्हावं।
असा पडावा पाऊस कधीतरी
की पसरल्या ओंजळीनं भरून जावं।
औंदर्याचं दान अक्षय राहावं
अन् घर मोत्यांनी भरून जावं।
असा पडावा पाऊस कधीतरी
की ऊन पावसाचं गाणं व्हावं।
स्वप्न नजरेत भरून राहावं
अन् अंधाराचं इंद्रधनू व्हावं।
--सुनील पवार..

5,958
People Reached
194
Engagements
No comments:
Post a Comment