Tuesday, 4 November 2014

।। संभ्रम ।।



।। संभ्रम ।।
संभ्रमाचे कोड़े मज..
अजुन नाही उलघडले..
मन होते वेडे बावरे..
इतकेच मज समजले..!!

दिवस रात्र स्वप्नाळू..
भास छळू लागले ..
पाऊल त्या वाटेवर..
हमखास वळु लागले..!!

नसता ती समोर..
मन उगाच हुरहुरले..
विचारात तिच्याच मग..
पुन्हा पुन्हा गुरफटले..!!

मित्रांच्या संगतीतही..
मन एकटे वावरले..
पाहता तीज समोर..
का उगाच बावरले..!!

कळेना माझे मलाच..
हे काय असे झाले..
मन सांगे मनास..
मज प्रेम झाले..!!
मज प्रेम झाले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

No comments:

Post a Comment