Monday, 13 October 2014

।। क्षणाचा ठेवा ।।


क्षणाचा ठेवा..

कधी वाटतो हवा हवा
कधी भासतो नवा नवा
भेटतेस तू जेव्हा जेव्हा
थबकतो क्षण तेव्हा तेव्हा..!!

त्या क्षणाचा ओळखून कावा
ह्रदय करते हृदयावर दावा
वाटतो माझा मलाच हेवा
मिठीत येशी तू जेव्हा जेव्हा..!!

नसतेस तू ज्या क्षणाला
आठवणीत त्या रमतो तेव्हा
बंद पापण्यांच्या कडातुन
ओघळतो त्या क्षणाचा ठेवा..!!
ओघळतो त्या क्षणाचा ठेवा..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

No comments:

Post a Comment