Friday, 10 October 2014

II कलेच्या कलेने II



II कलेच्या कलेने II
वाटले कलेकलेने घ्यावे..
कलेचे गुण गावे..
गुण गाता गाता..
तिचेच होऊन जावे..
तिचेच होऊन जावे...!!

वाटले चित्रकलेस घ्यावे..
डोळे भरून पहावे..
पाहता पाहता मग..
तिज आपलेसे करावे..
तिज आपलेसे करावे..!!

वाटले शिल्प कलेस घ्यावे..
मनाजोगते घडवावे..
घडवता घडवता मग..
तिज आपल्यात मिसळावे..
तिज आपल्यात मिसळावे..!!

वाटले हस्त कलेस घ्यावे..
हस्ताने झुलवावे..
झुलवता झुलवता मग..
तिज हळूच फुलवावे..
तिज हळूच फुलवावे..!!

पण...
नियतीस ते मान्य नसावे..
चित्राने विचित्र म्हणावे..
शिल्पाने बेढब वदावे..
हस्ताने कठोर व्हावे..
हिरमुसल्या मना सांग कोठे जावे..!!..
सांग कोठे जावे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

No comments:

Post a Comment