।। सोनेरी क्षण ।।
तुलाही आठवत असतील का ग
आपल्या प्रेमाचे ते सोनेरी क्षण..
मला शोधणारी तुझी जादुई नजर
अन तुझ्या भोवती घुटमळणारे माझे मन..!!
तासंतास तुझी वाट पाहत बसायचे
तू मात्र हटकुन उशिराच यायचे..
तू आली नाहीस की मग स्वतःवर रुसायचे
अन तुझ्या अल्लड बहाण्यात मी अलगद फसायचे..!!
चुकून कधी चक्र उलटे फिरले ज़रा जरी
तुझ्या रुसण्यास अन मौनास सीमा नसायची..
मग तुझी मनधरणी करण्यात सखे
दिवस काय सारी रात्रही तोकडीच असायची..!!
तुझा राग लटका असायचा हे मला जाणवायचे
तुझे ते बोलके डोळे हळूच मला खुणवायचे..
आवडायचे मला तुझे लटकेच रुसणे
अन मला फसलेला पाहुन तुझे खळखळुन हसणे..!!
कळलेच नाही ग ऋतुंनी कधी बदलली कुस
अन तुझ्या गुलाबी मनाला कोणी लावली फुस..
निघुन गेलीस तू सारेच घेवून सोनेरी क्षण
मागे उरलय मात्र आता एक खिन्न कोमेजलेल मन..!!
एक खिन्न कोमेजलेल मन..!!
सुनिल पवार
【चकोर】
तुलाही आठवत असतील का ग
आपल्या प्रेमाचे ते सोनेरी क्षण..
मला शोधणारी तुझी जादुई नजर
अन तुझ्या भोवती घुटमळणारे माझे मन..!!
तासंतास तुझी वाट पाहत बसायचे
तू मात्र हटकुन उशिराच यायचे..
तू आली नाहीस की मग स्वतःवर रुसायचे
अन तुझ्या अल्लड बहाण्यात मी अलगद फसायचे..!!
चुकून कधी चक्र उलटे फिरले ज़रा जरी
तुझ्या रुसण्यास अन मौनास सीमा नसायची..
मग तुझी मनधरणी करण्यात सखे
दिवस काय सारी रात्रही तोकडीच असायची..!!
तुझा राग लटका असायचा हे मला जाणवायचे
तुझे ते बोलके डोळे हळूच मला खुणवायचे..
आवडायचे मला तुझे लटकेच रुसणे
अन मला फसलेला पाहुन तुझे खळखळुन हसणे..!!
कळलेच नाही ग ऋतुंनी कधी बदलली कुस
अन तुझ्या गुलाबी मनाला कोणी लावली फुस..
निघुन गेलीस तू सारेच घेवून सोनेरी क्षण
मागे उरलय मात्र आता एक खिन्न कोमेजलेल मन..!!
एक खिन्न कोमेजलेल मन..!!
सुनिल पवार
【चकोर】

No comments:
Post a Comment