Tuesday, 9 December 2014

II हवे कशाला II



II हवे कशाला II
वास्तवाशी माझा घरोबा..
स्वप्नांचे इमले हवे कशाला..!!

ह्या मातीशी माझा याराना
आकाश कवेत हवे कशाला..!!

ओंजळीत भरून प्रकाश माझ्या
तिमिराचे भय ते हवे कशाला..!!

नाद ना मजला जुगाराचा
नसीबाचे फासे हवे कशाला..!!

खेळतो मी खेळ सत्याचा
पत्त्याचे डाव ते हवे कशाला..!!

बोलतो मी बोल ते खड़े
शब्दांचे बुडबुडे हवे कशाला..!!

जगने माझे हातात माझ्या
मरणाचे भय ते हवे कशाला..!!
सुनिल पवार
[चकोर]

No comments:

Post a Comment