Tuesday, 19 August 2014

II गोविंदा आला II


II गोविंदा आला II

गोविंदा आला रे आला..
तो कॉर्पोरेट लुक वाला..
पक्ष नेत्यांनी पुरस्कृत केला..
रंग राजकीय आहे चढलेला..!!

गोविंदा आला रे आला..
उंच थरांच्या ह्या थराराचा..
लाख रुपयांच्या आमिषाचा..
जातोय बळी बघा जीवनाचा..!!

गोविंदा आला रे आला..
रंग चढला रे चढ़ाओढीला..
उत आलाय फोडा फोडिला..
मूळ उद्देश गेला मोडीला..!!

गोविंदा आला रे आला..
कशा राहतील मागे बाला..
समरसून त्याही उतरल्या..
टक्कर देती त्या गोविंदाला..!!

गोविंदा आला रे आला..
ट्रक भरून गोविंदा निघाला..
बोल बजरंग बली की जय..
आसमंती नारा घुमू लागला..!!

गोविंदा आला रे आला..
कोणी निसटून थरावरून पडला..
कोणी जायबंदी, जीवास मुकला..
विचारी ना कोणी आता त्याला..!!

गोविंदा आला रे आला..
दिस सरला सण संपला..
पक्षांनी गाशा गुंडाळला..
गोविंदा विस्मृतीत गेला..!!

हाय रे गोविंदा....

पुरस्कार सारे हरवले..
आश्वासन हवेत विरले..
नेते आता दिसेनासे झाले..
गोविंदाचे हाल कुणी न पुसले..!!
गोविंदाचे हाल कुणी न पुसले..!!

*चकोर*


No comments:

Post a Comment